महापुरुषांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक

Kolhapur news
By -

 

                  



              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


कै. सौ. हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट, राज प्रकाशन आणि राजर्षी शाहू अध्यासन, कोल्हापूर" यांच्या वतीने देण्यात येणारा पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार 2025 गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांना  आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ अर्थतज्ञ जे. के. पवार यांच्या “राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही यावेळी पार पडला.


रयतेचे राजे राजर्षी शाहु महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात केलेले काम आदरणीय जयसिंगराव पवार यांनी लोकांसमोर मांडले आहे. महापुरुषांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आता आपली जबाबदारी सर्वांकडून पोचवले पाहिजेत. त्यासाठी हे विचार डिजिटल फुट प्रिंटवर येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले.


यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, वसुधाताई पवार काकी, बसवेश्वर चेणगे, बी.ए. पाटील, कॉ. दिलीप पवार, विजयसिंह शिंदे, बबनराव रानगे, रमेश जाधव, साथी हसन देसाई, बाळेश नाईक, प्राचार्य डॉ. दिनकर पाटील, मंजुश्री पवार, राजकुंवर पवार, दिग्वीजय पवार, श्रद्धा पवार आणि पवार कुटुंबिय यांच्यासह सामाजिक आणि राजकिय क्षेत्रातील अनेक नागरिक उपस्थित होते.




                --------------------------