आदमापूर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री संत बाळूमामांचा जन्मकाळ सोहळा संपन्न.

Kolhapur news
By -

 

          




             कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  आदमापूर येथे श्री संत बाळूमामा यांंचा 133 वा जन्मकाळ सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  ज्ञानेश्वरीतील नववा व बारावा या अध्यायांचे वाचन करण्यात आले. याशिवाय सद्गुरु बाळूमामा ग्रंथाचे सुद्धा वाचन करण्यात आले. 


    ह .भ .प. नानासो शि .पाटील यांचे प्रवचन तसेच नानासो द.पाटील यांचे कीर्तन झाले.दुपारी ४.२३ वाजता जन्मकाळ सोहळा पार पडला. सौ राजनंदिनी धैर्यशील भोसले यांच्या हस्ते पाळणा पूजन करण्यात आले. त्यांच्यासोबत अनेक सुवासिनींनी पाळणा म्हंटला व नंतर त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. फटाक्यांची  आतषबाजी , भंडाऱ्याची उधळण,चांगभलंचा जयघोष ,ढोल कैताळ यांच्या वाद्यासह श्रींची मंदिराभोवती  प्रदीक्षणा करण्यात आली.

     उत्सवात सहभागी देवस्थानचे सदस्य व भाविक याप्रमाणे.

    देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले, कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, संदीप मगदूम, यशवंतराव पाटील ,दिलीप पाटील संभाजी पाटील, इंद्रजीत खर्डेकर इत्यादी सह हजारो भाविक. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.




              -------------------