कोल्हापूर न्यूज नेटवर्क
एस.टी महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानामध्ये दुसऱ्या सर्वेक्षणाअंती कोल्हापूर विभागातील ४ बसस्थानके प्रादेशिक पातळीवर वरच्या क्रमांकावर आहेत .
पुणे विभागात अ गटामध्ये इचलकरंजी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ब गटामध्ये गारगोटी दुसऱ्या क्रमांकावर,
तर गडहिंग्लज बसस्थानक तिसऱ्या क्रमांकावर आहे.
क गटामध्ये मुरगूड बसस्थानक हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
२३ जानेवारी २०२५ रोजी पासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्वच्छता अभियान एसटी महामंडळाच्या ५६८ बसस्थानकांवर राबविण्यात येत आहे.
वर्षभर चालणाऱ्या या अभियानांतर्गत दर ३ महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचे मूल्यांकन करून त्यांना गुण दिले जातात. पहिल्या सहा महिन्यांतील सर्वेक्षणात कोल्हापूर जिल्ह्यातील २२ बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यापैकी इचलकरंजी हे बसस्थानक ८६ गुण मिळवून पुणे प्रदेशामध्ये अनुक्रमे दुसऱ्या क्रमांकावर आले आहे .
या गटात पहिल्या क्रमांकावर बारामती (९६ गुण) बसस्थानक आहे.
ब गटातील स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकलूज बसस्थानक पहिल्या क्रमांकावर असून कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी बसस्थानक ९४ गुण मिळवून पुणे प्रदेशात दुसऱ्या क्रमांकावर आले असून गडहिंग्लज बसस्थानक (९४ गुण) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या गटातील तिन्ही बसस्थानकांना समान गुण मिळाले असून बसफेऱ्यांची संख्या जास्त असल्याने पहिला क्रमांक अकलूज बसस्थानकाने पटकावला आहे.
क गटामध्ये मुरगूड बसस्थानक ९२ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.
या गटात सातारा जिल्ह्यातील मेढा बसस्थानक ९७ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
मुरगूड येथील सर्वेक्षण समारंभात पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजू चव्हाण यांचा एस. टी.चे वरिष्ठ अधिकारी विकास माने यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.कंट्रोलर लिमकर,पत्रकार सर्जेराव भाट,ओंकार पोतदार,जगदीश गुरव, (सामाजिक कार्यकर्ते) ,दत्तात्रय मोरे,(एस. टी सातारा ) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
---------------

