गुलामीची मानसिकता बदललीच पाहिजे. रामत्त्व तिचा ऱ्हास करेल.

Kolhapur news
By -

 

               




               कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले

 


  देशवासीयांनी  हजारो वर्षांची गुलामीची मानसिकता आता बदललीच पाहिजे.अयोध्येच्या मंदिरावरील धर्म ध्वज हाच संदेश आपल्याला देत राहील. असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमोघ शैलीतील भाषणात आज काढले.

 

      पंतप्रधान  यांच्या शुभ हस्ते आज अयोध्येच्या राम मंदिरा वर धर्म ध्वजाची स्थापना करण्यात आली.

     हजारो वर्षे आपण गुलामीच्या मानसीकतेतच  वावरत आहोत. केवळ रामत्व याचा ऱ्हास करू शकेल.

   प्रभू रामाने दीन,दलीत,मागास,अती मागास,स्त्रिया या सर्वांचाच सन्मान केला . सर्वांच्या  उद्धाराचा  संदेश त्यांनी आपल्या  तत्वातून दिला आहे.

 सत्य हे अविनाशी असते.तोच खरा मानव धर्म होय अशी शिकवण त्यांनी दिली.यासाठी गुलामी झुगारून द्या असा संदेश त्यांच्या जीवनातून मिळाला आहे. त्यासाठी शौर्य आणि धैर्य ही दोन चाके जिवन रथाला  जोडली पाहिजेत.

   आज पासून २०० वर्षा पूर्वी मेकॉले ने सांगितले होते की भारतीयांची शिक्षण पद्धती बदलली पाहिजे तरच हा देश आमचा (इंग्रजांचा) गुलाम म्हणून राहू शकेल.त्याप्रमाणे ती पद्धती बदलली गेली. आता आपण स्वतंत्र आहोत.आता त्यातून बाहेर पडूया .

   राम सर्वांचा आहे.मानवतेचा मान बिंदू आहे.

  जर आपण रामत्व ( म्हणजेच राम तत्व) स्वीकारले  तर  जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थ व्यवस्था आपण निर्माण करू.

      लोकशाही नसा नसा त रुजली पाहिजे आणि तितकीच सशक्त झाली पाहिजे.अयोध्येच्या राम मंदिरावरील हा धर्म ध्वज हाच संदेश देत राहील.

            


            ----------------------------