कोल्हापूर न्यूज नेटवर्क
टीईटी परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणात आणखी ९ आरोपींना अटक केली आहे . या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे .
कागल तालुक्यातील सोनगे येथील शिवकृपा फर्नीचर मॉलमध्ये छापा टाकून पेपर फोडण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला होता. सोनगेतील मॉलवर छापा टाकून गुन्हा दाखल केला त्यावेळी सात आरोपींना अटक करण्यात आली होती . यातील मुख्य सुत्रधार महेश भगवान गायकवाड, सातारा हा फरारी होता. गुन्हा दाखल झालेनंतर अटक सात आरोपींची २५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर होती. पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आरोपीकडे तसेच गुन्हयाचे ठिकाणी मिळालेल्या पुराव्याचे आधारे सखोल तपास करून या गुन्हयात सहभागी असणाऱ्या आणखीन ११ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मध्ये रोहीत पांडुरंग सावंत, (कासारपुतळे, ता. राधानगरी) जि. कोल्हापूर, ) अभिजीत विष्णू पाटील (रा.बोरवडे, ता. कागल) जि. कोल्हापूर ) , संदिप भगवान गायकवाड, (बेलवाडी, ता. कराड) ,अमोल पांडुरंग जरग (सरवडे, ता. राधानगरी). स्वप्निल शंकर पोवार (कासारपुतळे, ता. राधानगरी), रणधीर तुकाराम शेवाळे (सैदापूर, ता. कराड), तेजस दिपक मुळीक (निमसोड, ता. कडेगांव, जि. सांगली), प्रणय नवनाथ सुतार (खोजेवाडी, जि. सातारा) संदिप शिवाजी चव्हाण (कोपर्डे हवेली, ता. कराड) श्रीकांत नथुराम चव्हाण (विद्यानगर कराड) यांना तसेच रॅकेटचा मुख्य सुत्रधार महेश भगवान गायकवाड (बेलवाडी, ता. कराड) यास कराड येथून ताब्यात घेतले आहे.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, मुरगूड पोलीस ठाणा येथील सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस अमंलदार युवराज पाटील, राजेश राठोड, विनोद चौगुले, प्रदिप पाटील, राजू कोरे, रोहीत मर्दाने, विजय गोसावी, अमित सर्जे, अमित मर्दाने, निवृत्ती माळी, महेश खोत, सागर चौगुले, महेश आंबी, राजेंद्र वरंडेकर, सुशिल पाटील, शिवानंद मठपती तसेच सायबर पोलीस ठाणेचे पोलीस अमंलदार सुरेश राठोड यांनी ही कारवाई केली आहे.
----------------------------------

