शालेय विद्यार्थी - विद्यार्थीनींसाठी एसटीची १८००२२१२५१ हि' हेल्पलाईन सुरू' - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Kolhapur news
By -

 

               


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क  

   

          महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी  एसटी महामंडळाची *' १८००२२१२५१  या क्रमांकाची हेल्पलाइन '* सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली.

  

      याशिवाय राज्यभरातील लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटी महामंडळ शाळेत जाण्यासाठी व तेथून घरी येण्यासाठी बस फेऱ्या उपलब्ध करून देत असते. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना घरातून शाळेला जा - ये करण्यासाठी मासिक पास मध्ये ६६.६६ %  सवलत  तसेच संध्याकाळच्या वेळी शाळा -महाविद्यालय सुटल्यानंतर किमान एक तासात मुले आपल्या घरी जाणे अपेक्षित असते. परंतु, बसेस वेळेवर न आल्याने अथवा अचानक रद्द झाल्याने मुलांना घरी पोहोचण्यास खूप उशीर होतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या पालकाचे बोल खावे लागतात. अनेक ठिकाणी तर गैरसमजातून पालकांनी विद्यार्थ्यांना उशिरा येण्याबद्दल शिक्षाही दिलेल्या आहेत. याचा विपरीत परिणाम म्हणून कांहीं विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत.


   या सर्व समस्या लक्षात घेऊन महामंडळामार्फत वरील हेल्प लाईन नंबर देण्यात आला आहे.


                ---------------------------------