कोल्हापूर न्यूज नेटवर्क
भूसंपादनाचा आठ एकराचा स्लॅब बदलून चार एकराचा करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे याची शेतकऱ्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
तत्कालीन शासनाने चार एकराचा स्लॅब बदलून आठ एकर करण्याचा निर्णय 2014 साली घेतला होता. परंतु आता परत अकरा वर्षानंतर शासनाकडून आठ एकराचा स्लॅब बदलून परत चार एकर करण्याविषयी हालचाली सुरूअसल्याचे संकेत प्रशासकीय सूत्रांच्याकडून शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे. शासनाने भूसंपादनाचा आठ एकरावरून चार एकराचा स्लॅब बदलण्याचा निर्णय घेतलाच तर काय करावयाचे याच्या नियोजनाची चर्चा शेतकऱ्यांच्या मध्ये आत्तापासूनच सुरू झाली आहे.
-------------------------

