राजकीय विरोधक एकाच फ्रेममध्ये

Kolhapur news
By -

 


   सातारा : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्ष निवडणुकीनंतर, नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेही आभार मानले होते. कारण, या दोन्ही नेत्यांनी त्यांना निवडणुकीत मदत केली होती. विशेष म्हणजे, याच निवडणुकीसंदर्भात बोलताना शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुकही केले होते. आता सातारा येथील एका विवाह सोहळ्यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.


   विशेष म्हणजे या सोहळ्यात त्यांच्यासोबत उद्योगपती गौतम अदानी यांचीही उपस्थिती होती. या तीन महत्त्वाच्या व्यक्तींचे एकत्र असलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या भेटीची माहिती खुद्द शरद पवारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.



                   -------------------------