कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
दिवार चित्रपटातील अभिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यामधील हा संवाद कित्येक वर्ष युवकांच्या मनात घर करून आहे.
या संवादातून केवळ स्टाईल व्यक्त होत नाही तर लोकमानसातील भावना सुद्धा व्यक्त होतात. बिहारमध्ये नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांनी मिळवलेले यश हे अशाच प्रकारचे आहे.
नितेश कुमार गेले अनेक वर्ष मुख्यमंत्री आहेत. स्वच्छ कारभार व विनम्रता यातून त्यांनी जनमानसात चांगले स्थान मिळविले आहे.
त्यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी बिहार मध्ये जंगल राज चालवले होते. अनेक घोटाळे, गैर कारभार आणि घराणेशाही याला राज्य वैतागले होते. लालू नंतर राबडी, त्यानंतर तेजस्वी ही साखळी बिहारच्या गोरगरीब जनतेने तोडून मोडून टाकली आहे.
बिहार ची सामाजिक रचना लक्षात घेतली तर लक्षात येईल की हे राज्य बुद्धिवंतांचे,तपस्वी महात्म्यांचे ,कष्टकऱ्यांचे आहे. बुद्ध, महावीर,चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य यांच्या तेजोमय संस्कृतीने ललामभूत झाले आहे.
पुढे जातिभेदाचा डाग या गरीब राज्याला लागला.ठाकूरांच्या वाड्या समोरून जाताना चप्पल काढून गरीबांनी,दलितांनी, मजुरांनी जायचे अशी प्रथा असलेला बिहार आता जागा झाला आहे.
तेजस्वी यादवांनी घरपती नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.बुद्धिवंत हसले .दलीत सावरले.युवक सावध झाले आणि ओरडले .
"बस्स करा आता हे डायलॉग.
नोकऱ्या आम्हीं मिळवतो फक्त संधी मिळायला हवी."
नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारनी बिहारी युवकांना हेच पटवून दिले.
बिहारचे अनेक हुशार युवक युवती आय ए एस,आय पी एस होऊन देशभर सेवा बजावत फिरत असतात.या बुद्धिवंतांना त्यांच्याच राज्यात अनेक पदे मिळू शकतील हे पटवून दिले आहे. मोठ मोठ्या विकास योजना नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये लागू केल्या आहेत.
त्यामुळे प्रत्येक बिहारी माणसाला भारतीय जनता पक्ष हा मातृस्थानी वाटतो आहे.
सगळ्यात मोठी गोची झाली आहे ती म्हणजे मत चोरीचा आरोप करून मध्येच पळ काढणाऱ्या व परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या राहुल बाबांची. काँग्रेसला दोन अंकी आकडा सुद्धा गाठता आला नाही.
महाराष्ट्रात ठाकरे बंधूंना सुद्धा चांगलाच दणका बसणार आहे हे यावरून दिसून येते.
भारतीय जनतेला राशन, भाषण यातून बाहेर पडायचे आहे.चंद्र,मंगळ , आणि आत्मनिर्भर भारताची स्वप्ने पाहणाऱ्या मोदींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास बसत चालला आहे . बिहारने नेमके हेच दाखवून दिले आहे.
छातीवर हात ठेऊन तिथल्या गरीब , दलीत आणि मुस्लिम जनतेने सुद्धा म्हंटले आहे.
"मेरे पास माँ है."
--------------------------

