काेल्हापूर न्यूज नेटवर्क
फेब्रुवारी व मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा ह्या सीसीटीव्ही च्या निगराणी खालीच होतील. ज्या ठिकाणी दहावी व बारावी परीक्षा केंद्र आहेत त्या ठिकाणी जर सीसीटीव्ही नसतील तर संबंधित शाळांची मान्यता रद्द होऊ शकते. प्रत्येक केंद्रावर शंभर टक्के सीसीटीव्ही बसवावेच लागतील असे प्रतिपादन कोल्हापूर विभागीय बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
ते संजय घोडावत जुनिअर कॉलेज अतिग्रे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापुर विभाग व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बोर्ड परीक्षा पूर्वतयारी मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेत ते बोलत होते.
परीक्षा यंत्रणेत प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्त्वाची असते.शासनाच्या विविध योजनांचे काम कोल्हापूर जिल्हा चांगले आहे. असे सांगून ते म्हणाले व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जर भौतिक सुविधा उपलब्ध करून दिली.
तर समाजातील आपले स्थान समजते. सर्व स्पर्धांना तोंड देणारा विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षकानी करावे. भयमुक्त कॉपीमुक्त वातावरणात विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी उत्तर लेखनाचा सराव महत्वाचा आहे. तो संपूर्ण शाळा मधून राबवावा.कॉपी मुक्त अभियान प्रभावीपणे राबवणे हा जिल्हा दक्षता समितीचा यावर्षीचा अजेंडा आहे. विद्यार्थी पालक एकत्र करून परीक्षेमध्ये कॉफी करणार नाही, गैरमार्गाचा वापर करणार नाही याची शपथ घ्या जेणेकरून विद्यार्थी परीक्षेला घाबरणार नाही. पालकांना परीक्षेसंदर्भात माहिती प्राप्त होईल.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी राजेश क्षीरसागर हे ज्यावेळी पासून कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत त्यावेळी पासून कॉफी मुक्त अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. सीसीटीव्ही अनिवार्य असतानाच शासनाकडून जेवढी मदत करता येईल त्यासाठी प्रयत्न केले जातील. दोन दिवसात संचमान्यता डाटा फॉरवर्ड करा, युडायसची कारवाई पूर्ण करा, व्हीएसके अँप वर विद्यार्थी उपस्थिती नोंदवा, विद्यार्थी सुरक्षा प्रश्नावली पूर्ण करून पाठवा ,शंभर टक्के आधार व्हॅलिटेशन,अपार आयडी काम पूर्ण करा, परीक्षा पे चर्चा विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करा अशी माहिती दिली.
प्राचार्य विराट गिरी ,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, बोर्डाचे सहसचिव किल्लेदार, श्री उकीरडे,माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले ,अजय पाटील , हनुमंत बिराजदार,विस्तार अधिकारी धनाजी पाटील , जयश्री जाधव कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.
------------------------------

