परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नागरिकांसाठी तक्रार निवारण वेबसाईट.

Kolhapur news
By -

              


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क

              

     राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक दिला आहे.त्यावर महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद ही मिळाला आहे.आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत परिवहन  खात्याशी संबंधित असलेल्या राज्यातील सर्व नागरिकांच्या साठी तक्रार निवारण वेबसाईट सुद्धा सुरू केली आहे.

 ती वेबसाईट याप्रमाणे.

www.pratapsarnaik .com

     या वेबसाईटवर सुविधा (Subscribe) व तक्रार निवारण (Grievances) या दोन्ही सोयी उपलब्ध असतील.


   परिवहन खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या आर टी ओ व एस टी या खात्यासंबंधीच्या तक्रारी व सूचनां  व अडचणी साठी नागरिकांनी या संकेत स्थळावर (वेबसाइटवर) संपर्क साधावा असे एका परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे.तक्रार निवारण अधिकारी म्हणून अभिजीत भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या सहायार्थ संबंधित खात्याच्या इतर चार अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.


     आलेल्या तक्रारी किंवा सूचनांवर मंत्री महोदयांची शिफारस घेऊन तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असे परिपत्रकात म्हंटले आहे.


            ----------------------------