कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
अवघ्या २७ वर्षे वयाचे बागेश्वर धाम सरकार यांनी दिल्ली ते वृंदावन अशी पदयात्रा गेल्या महिन्यात (७ ते १६ नोहेंबर) काढली.या पदयात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेचे स्वरूप आध्यात्मिक असले तरी मुख्य मागणी हिंदू राष्ट्राचीच होती.हिंदू राष्ट्र कसे असावे यावर त्यांनी एका घोषणेतून उत्तर दिले.
"जात पात की करो बिदाई हम सब हिंदू भाई भाई."हीच ती घोषणा होय.घोषणा अत्यंत समर्पक आहे. हजार वर्षे गुलामीत काढलेल्या हिंदुस्थानला "तू हिंदू राष्ट्र आहेस ,जागा हो ."
असं पहिल्यांदा सुनावले ते शिवछत्रपतींनी.त्यानंतर कांहीं वर्षांनी स्वामी विवेकानंदांनी ,आणि आता धीरेंद्र शास्त्री उर्फ बाबा बागेश्वर यांनी.आपले संविधान सांगते की भारत उर्फ हिंदुस्थान हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. याचा नेमका अर्थ काय ?
या देशात सर्व धर्माचे नागरिक आहेत.त्या सर्वांचे हे राष्ट्र आहे.राष्ट्राला विशिष्ठ असा वेगळा धर्म नाही.यात वावगे असे कांहीं नाही.संविधानाच्या पहिल्या पानावर प्रभू रामचंद्रांचे सुंदर चित्र आहे.भारत हे राम राज्य व्हावे हा संदेश त्यातून दिला आहे .रामराज्यात भिल्ल,निषाद,वनवासी, दलीत,किन्नर, स्त्री आणि पुरुष या सर्वांना समान न्यायाने वागवले जायचे. एक बाणी,एक पत्नी,मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांचा आदर्श संविधानाने समोर ठेवला होता. द्वेष ,मत्सर , आणि नैराश्य मूलक सूड भावना यातून पाकिस्तानी मुस्लिमांनी त्यावेळी हिंदूंची अमानुष कत्तल केली.काश्मीर मिळत नाही म्हणून पाकिस्तान धार्जिण्या अतिरेक्यांनी तेथील लाखो पंडितांची कत्तल केली,त्यांना त्यांच्याच मालमत्तेतून बेघर केले, हिंदू स्त्रियांचे अपहरण व बलात्कार याला तर सीमाच नव्हती.यापेक्षा भीषण होते ते म्हणजे जीवे मारण्याची धमकी देऊन केलेले धर्मांतरण.
धर्मांतरण हे काय आजचे नाही.बाबर ते औरंगजेब पर्यंत च्या सर्व आक्रमण कर्त्यांनी ते अखंड सुरू ठेवले होते. यातून भारतात अजून हिंदू बहुसंख्य आहेत हेच या देशाचे वैशिष्ट्य आहे. धर्म परिवर्तित असे अनेक मुस्लिम, ख्रिश्चन,या देशात बंधुभावाने रहात आहेत.पण त्यांच्यात विष पेरले जात आहे.संसदेवर हल्ला केलेला अफजल गुरु हा मूळचा काश्मिरी पंडित होता.गुरु आणि पंडित म्हणजे देवळाचे पुजारी होत.काश्मीरमध्ये हजारो मंदिरे आहेत.मारला गेलेला टोळी प्रमुख वाणी हा सुद्धा मूळचा हिंदुच होता.
केवढे भयंकर परिवर्तन हे.जणू एक हृदय काढून दुसरेच बसवलेले आहे.धर्म परिवर्तनाच्या राक्षसी महत्वाकांक्षेने पछाडलेल्या परकीय दुष्ट शक्ती यामागे आहेत.२०४७ पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र करणारच या वेड्या विचाराने भारलेल्या परकीय धर्मगुरू, मुल्ला,मौलवी ,यांनी उच्छाद मांडला आहे.भारतातील डाव्या विचारसरणीच्या तथा कथित स्वयंघोषित पुरोगाम्यांना हे सत्य अजून पटत नाही.ते लोक हिंदूनाच दोष देतात . इंग्लंड अमेरिकेत अनेक शहरात मुस्लिम महापौर व नगर सेवक आहेत .ते दिवसातून पाच वेळा आपल्या नमाज पडत असतात. कधि कार्यालयात तर कधि कार मध्ये.पडू देत .ती त्यांची धर्म श्रद्धा असेल.
आपल्या संविधानाने श्रद्धेचे स्वातंत्र्य तर सर्वांनाच दिले आहे. धर्म परिवर्तनाला मात्र स्वातंत्र्य दिलेले नाही. लव्ह जिहाद हा त्यातीलच एक निंदनीय प्रकार आहे. हे प्रकार थांबले पाहिजेत.यासाठीच हिदू राष्ट्र नावाची जोराची चळवळ सुरू आहे.हिंदू हे कुठल्या धर्माचे नाव नाही.त्याला संस्थापकच नाही. हिंदू म्हणजे प्राचीन काळापासून चालू असलेली जीवन पद्धती आहे.विश्व बंधुत्वाचा संदेश देणारा हा सहिष्णू सनातन समाज आहे.यातील पारंपरिक त्रुटी दूर करून राष्ट्र धर्म जागविणारी ही चळवळ आहे."जात पात की करो बिदाई ,हम सब हिंदू भाई भाई." ही चळवळीची घोषणा आहे.
परधर्मिय समजून हिंदू समाजाने एक दगड सुध्दा कुठल्या मशिदीवर किंवा गिरिजा घरावर (चर्च) वर मारला नाही.उलट हिंदू म्हणून विचारणा करून व शारीरिक तपासणी करून २६ महिलांचे कुंकू (सिन्दुर) पुसणाऱ्या विकृत प्रवृत्तीचा अनुभव आपल्याला आला. दिल्लीतले बॉम्ब स्फोट तर उच्च शिक्षित डॉक्टर मुस्लिमांनी घडवले.त्यांच्या सिरिंज मध्ये कोठून आले हे जहर ? ...ज्या मातीत जन्म घेतला,जीवन व्यतीत केले , त्या मातीशी इमान राखा असा दिव्य संदेश हिंदू राष्ट्र चळवळीतून दिला जात आहे.ही चळवळ फक्त इथल्या हिंदूंनाच नव्हे तर मुस्लिम,ख्रिश्चन,बौद्ध, आदिवासी इत्यादी सर्वांनाच जागी करणारी अशी आहे.तशीच असली पाहिजे.संविधानाचा सन्मान करत ती जगाला साद घालत आहे. आम्हीं जगात एकटेच आहोत. आम्हांला नीट जगू द्या.
--------------------------------

