नागपूर येथील जुन्या पेन्शनसाठीचे उग्र आंदोलन यशस्वी ‌‌.- - प्रा. विजय शिरोळकर

Kolhapur news
By -

 

            



         कोल्हापूर न्यूज नेटवर्क  

    

            दिनांक १९ डिसेंबर २०२५रोजी महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर  कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार  महाराष्ट्र राज्यातील२६ हजार पेन्शन पिडीत शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांना महाराष्ट्र राज्य सरकारने जुनी पेन्शन बहाल करावी यासाठी आंदोलन छेडण्यात आले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या  संविधान चौकातील भव्य पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून  आंदोलनास प्रारंभ झाला.


    महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नागपूर येथील सचिवालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन पेन्शन पीडित बंधू भगिनी यांच्या न्याय हक्काची कैफियत मांडली.  सचिवालय येथील ओ.एस.डी  यांनी संघटना प्रतिनिधींचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतले व मा. मुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर संघटना प्रतिनिधींची बैठक नक्कीच आयोजित केली जाईल असे अश्वासित केले. तसेच सदर बैठक आयोजित करण्याबाबत दप्तरी नोंद घेऊन निवेदनाचा स्वीकार केला.


    त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी  ( केंद्रीय मंत्री रस्ते परिवहन व महामार्ग भारत सरकार) यांचे जनसंपर्क कार्यालय नागपूर  येथे संघटनेच्या वतीने धडक देण्यात आली.  त्यांचे ओ.एस.डी  यांच्या समवेत जुनी पेन्शन मागणीबाबत चर्चा केली. मा.श्री नितीनजी गडकरी साहेब यांनी मुख्यमंत्री व पेन्शन पीडित बांधव यांच्यामध्ये समन्वय साधून लवकरच आम्हाला न्याय द्यावा अशी आग्रही मागणी केली. ओ.एस‌.डी  यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन अनेक दिवसापासून वंचित असणारे १ नोव्हेंबर २००५ पूर्व  नियुक्त पेन्शन पीडित बंधू भगिनी यांना लवकरच न्याय मिळेल असे ग्वाही दिली. तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी  यांच्या समवेत संघटना प्रतिनिधींची बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही दिली. 

           आर‌ एस. एस.  सरसंघचालक मुख्यालय नागपूर येथे आपल्या संघटनेच्या वतीने  प्रत्यक्ष भेट देऊन पेन्शन पीडित बांधवांच्या व्यथा सरसंघ प्रचारक यांच्याकडे मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. एक नोव्हेंबर २००५ पूर्व पेन्शन पिढीत शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण मुख्यमंत्री महोदय यांना आमची कैफियत सादर करावी असे विनंती पूर्वक निवेदन सादर केले. सदर मागण्या बाबत यशस्वी तोडगा नाही निघाला तर पुढील आंदोलन बारामती आणि नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान मुंबई येथे करण्यात येण्याचा इशारा राज्याध्यक्ष विजय शिरोळकर यांनी दिला.

      

      सदर आंदोलन प्रसंगी राज्य अध्यक्ष प्रा. विजय  शिरोळकर , राज्य उपाध्यक्ष प्रा.संपत कदम, सचिव भास्कर देशमुख ,  उपसचिव प्रा. निशिकांत कडू, मारोती खेडकर, नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोखंडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष  राजू लहासे , मुंबई विभाग प्रमुख  नाना राजगे, नागपूर विभाग प्रमुख प्रा. रणजीत तावरे प्रा. सोनकुसरे यांच्यासह महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, खास करून महिला भगिनी व अनेक पेन्शन पीडित बांधव उपस्थित होते.


         -----------------------------