स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नानीबाई चिखलीत ग्रंथालय उभारण्याचा संकल्प

Kolhapur news
By -

 

                      


             कोल्हापूर न्यूज नेटवर्क    


         नानीबाई चिखली येथील पंचशील नगर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर चिखली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चिखली ग्रामस्थांचे अनोख्या  पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले . वृक्षारोपण कार्यक्रम आयोजनाबरोबरच  प्रशालेत   "राजगृह" नावाचे सुसज्ज वाचनालय उभारण्याचा  संकल्प सर्व मान्यवरांनी केला.  


शनिवार 6 डिसेंबर 2025 रोजी नानीबाई चिखली येथील समस्त चिखली ग्रामस्थांनी गावच्या जिल्हा परिषदेच्या "डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर चिखली" या प्रशालेत एकत्र येत "डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन शाळा बचाव समिती प्रमुख माजी सैनिक महादेव कांबळे , देशात गोपाल रत्न प्रथम पुरस्कार प्राप्त अरविंद पाटील,  सरपंच युवराज कुंभार ,सर्व शाळा बचाव समिती सदस्य, मान्यवर सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, पोलीस पाटील अमृता कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी त्रिशरण पंचशीलाचे पठण करून ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण केले व सदर प्रशालेत सर्व सोयींनी सुसज्ज असे तालुक्यातील अगदी प्रज्ञाशोध परीक्षेपासून एमपीएससी व यूपीएससी पर्यंतच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे "राजगृह" वाचनालय उभारण्याचा संकल्प केला .या कार्यक्रम प्रसंगी  सरपंच युवराज कुंभार, माजी सरपंच अल्लाबक्ष सय्यद सर, विजय घस्ती ,सरस्वती चिखलीकर , शाळा  बचाव समिती प्रमुख , खडकेवाडा केंद्र शाळा केंद्रप्रमुख संजय चिखलीकर ,ओमाजी कांबळे सर , डॉ.अजय चिखलीकर, विशाल चिखलीकर, बाळासो घस्ती, वाय.आर.कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दादासो चिखलीकर ,गायत्री कांबळे, माधुरी कांबळे, गजानन कांबळे प्रशालेचे मुख्याध्यापक विवेक गवळी,  शिक्षिका कुंभार मॅडम ,शितल कांबळे मॅडम, सरिता कांबळे मॅडम व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       

          -------------------


"संपूर्ण भारत देशात "गोपाल रत्न प्रथम क्रमांक पुरस्कार" प्राप्त नानीबाई चिखली गावचे आयु.अरविंद यशवंत पाटील यांचे विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर  अनोखे अभिवादन ...राष्ट्रीय गोपाळ रत्न प्रथम क्रमांक पुरस्कारा मधील प्राप्त रकमेतील "50 हजार" रुपयांची मदत "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर प्रशालेत प्रस्तावित "ग्रंथालयास" देणार दान..

गेल्या 30 वर्षापासून दुग्ध व्यवसायामध्ये संपूर्ण देशभरामध्ये नाव कमावलेल्या नानीबाई चिखली गावचे प्रतिष्ठित नागरिक आयु.अरविंद यशवंत पाटील यांनी आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गावच्या पंचशील नगर मध्ये असलेल्या "डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर, चिखली "या जिल्हा  परिषदेच्या शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.सदर कार्यक्रमास संपूर्ण गावातील अनेक ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.या अभिवादनाच्या कार्यक्रमामध्ये गावातील मान्यवरांनी "डॉ.बाबासाहेब आंबेडकर "यांना ज्ञानरूपी आदरांजली व्यक्त करण्याचा मनोदय व्यक्त केला. सदर कार्यक्रमास गावातील उच्चशिक्षित वैद्यकीय, शिक्षण ,कृषी, समाजसेवा क्षेत्रातील मान्यवर प्रशालेत उपस्थित  होते.गावातील तसेच तालुक्यातील गोरगरीब  विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे राजगृह नावाचे वाचनालय उभारण्याचा संकल्प मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला .गावातील, तालुक्यातीलच नव्हे संपूर्ण जिल्ह्यातील अगदी चौथीच्या प्रज्ञा परीक्षेपासून MPSC, UPSC, तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वाचनालयासाठी "50 हजार "रुपयांची मदत अरविंद पाटील यांनी त्यांना गोपाळ रत्न पुरस्कारामधून मिळणाऱ्या रकमेतील ही रक्कम गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच ग्रंथालय चळवळ बळकट करण्यासाठी जाहीर केली . "आपल्या गावात, तालुक्यात त्याचबरोबर जिल्ह्यात वाचनालय चळवळ बळकट होऊन विविध क्षेत्रात पुस्तक रुपी ज्ञानातून विद्यार्थी आपले उज्वल भविष्य घडवतील व या पुस्तकातून डॉ.आंबेडकर तसेच सर्व महापुरुषांचे  विचार भविष्यातील पिढ्यांसमोर आदर्श निर्माण करतील" असे विचार त्यांनी या सदर अभिवादन कार्यक्रमात उपस्थित मान्यवर  व विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. 

       



   -------------------------------------