कोल्हापूर न्यूज नेटवर्क
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या व्यवस्थेने शिक्षण नाकारलं त्या व्यवस्थेला आव्हान देत केवळ शिक्षणच घेतले नाही तर जगातील ज्ञान आणि शिक्षणाचे उच्चतम प्रतीक झाले आणि ज्ञानाची व शिक्षणाची द्वारे आपल्यासारख्या वंचितांच्या शोषितांच्या मुलांना खुली केली असे प्रतिपादन यमगे केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख संजय कुर्डूकर यांनी केले.
मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते .अध्यक्षस्थानी प्राचार्य एस .पी. पाटील होते.
". शालेय गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा" मानकाच्या मुल्यमापन तपासणीसाठी तालुकास्तरीय पथकाने प्रशालेला भेट देऊन तपासणी केली.
केंद्रप्रमुख कुर्डूकर म्हणाले, " शिव, शाहू, फुले, सावित्रीबाई आणि आंबेडकर यांच्या प्रयत्नातून खुले झालेल्या शिक्षणाचा मुलीने फायदा घेऊन आत्मविकास करण्यास प्राधान्य द्यावे शिक्षणाशिवाय मुलींचे आयुष्य सुकर होणार नाही ". याप्रसंगी प्राचार्य एस. पी. पाटील यांचे मनोगत झाले. तपासणी पथकातील मुख्याध्यापक उत्तम प्रधान, एस के पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
स्वागत प्रास्ताविक एम.बी.टेपुगडे यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संजय कुर्डूकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्पक एस.बी.सुर्यवंशी, उपप्राचार्य व्ही.जी घोरपडे, पर्यवेक्षक एस.डी.साठे, तंत्र विभाग प्रमुख पी.बी. लोकरे, के बी वाघमोडे, श्रीकांत कुंभार, एम. एस. कांबळे, एम.डी खाटांगळे, वाय.ई देशमुख, व्ही एस सूर्यवंशी, एस. पी. बाईत, ए एन पाटील, समीर कटके, एम एच खराडे, आनंदा मांगोरे, अजित सावंत, प्रवीण शिगावकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुरगुड : येथील मुरगुड विद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना केंद्रप्रमुख संजय कुर्डुकर, प्राचार्य एस. पी. पाटील, उत्तम प्रधान, एस के पाटील आदी मान्यवर.
-------------------



