मुलाच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या नानीबाई चिखलीतील शिवाजी कोळी यांचा अपघातात जागीच मृत्यू ; पत्नी आणि नात जखमी

Kolhapur news
By -

             


              

             कोल्हापूर न्यूज नेटवर्क   

     

        कोल्हापूर गारगोटी मार्गावरती  चुये फाटा येथे  झालेल्या अपघातामध्ये नानीबाई चिखली येथील शिवाजी शंकर कोळी (वय ४५ ) हे जागीच ठार झाले असून त्यांची पत्नी  आणि नात गंभीर जखमी असून पत्नीला  वैशाली कोळी (वय ३९) सीपीआरमध्ये तर नातीला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे .


       शिवाजी कोळी हे कागलच्या एमआयडीसीमध्ये एका कंपनीमध्ये कार्यरत होते.  ते सध्या सहकुटुंब कागल मधील अनंत रोटो येथे राहत हाेते . बेले येथील एका अकॅडमी मध्ये मुलाच्या प्रवेशाची चौकशी करण्यासाठी  ते पत्नी आणि  साडेतीन वर्षाच्या नाती बरोबर निघाले होते. चुये फाट्याजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या ओमनी गाडीने त्यांना जोराची धडक दिल्याने  ते फरफटत झाडावर जाऊन आदळल्याने त्यांचा अपघात स्थळीच मृत्यू झाला तर पत्नी  वैशाली  आणि साडेतीन वर्षाची नात  सुप्रभा दळवी गंभीर जखमी असून पत्नीला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे , तर नातीला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. शिवाजी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरा कागल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

       






         --------------------------