कोल्हापूर न्यूज नेटवर्क
डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, गोकुळ दूध, जिल्हा परिषद, आणि आत्मा, कोल्हापूर यांच्या संयुक्त सहकार्याने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या "सतेज कृषी प्रदर्शनाचा" उद्घाटन सोहळा शेतकरी नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते, ऋतुराज संजय पाटील आणि आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत तपोवन मैदान कोल्हापूर येथे पार पडला.
याप्रसंगी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख विजय देवणे, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, इंद्रजीत बोंद्रे, मधुकर रामाणे, ईश्वर परमार, गोकुळ संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील- चुयेकर, बयाजी शेळके, कळंबा सरपंच सुमन गुरव, जिल्हा परिषद माजी सदस्य शशिकांत खोत, बाबासाहेब सरनाईक, बाजार समितीचे सुयोग वाडकर, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर, प्रदर्शनाचे आयोजक विनोद पाटील, धीरज पाटील, स्वप्नील सावंत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतेज कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीचे नवे क्षितिज उघडणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान, उद्योग, बाजारपेठ आणि प्रशिक्षण यांचा सर्वांगीण आढावा एका ठिकाणी मिळवून देत ‘सतेज कृषी’ शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने ज्ञान आणि संधीचे केंद्र ठरते. आधुनिक यंत्रसामग्री, सुधारित बियाणे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांच्या माध्यमातून शेतकरी नव्या तंत्रज्ञानाशी जोडले जात असल्याने त्याचा अभिमान वाटतो. या भव्य कृषी प्रदर्शनाला सर्वांनी भेट देऊन आधुनिक शेतीतील नव्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन सर्वांना करतो.
---------------------------------------

