कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हल्लाबोल हल्लाबोल...टीईटीविरोधी हल्लाबोल, २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेची सक्ती रह करा, शिक्षण सेवकपद रद करा, १५ मार्च, २०२४ ची संचमान्यता रद्द करा अशी जोरदार घोषणाबाजी करत जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाद्वारे धडक दिली. या महामोर्चात शिक्षिकांचीही संख्या लक्षणीय होती. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकीसह झालेल्या धक्काबुक्कीने येथील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्याक आले आहे. याला सर्वच शिक्षक संघटनांकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करायी या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. ५) शिक्षकांनी शाळा बंद ठेवून राज्यव्यापी आंदोलन केले. याला जिल्ह्यामधील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला . शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, दादासाहेब लाड, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पोवार, आर. वाय. पाटील, बाबा पाटील आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली.
या मोर्चामध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, शिक्षक नेते प्रभाकर आरडे, क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, भैय्या माने विवेकानंद संस्थेचे कोल्हापूर विभागाचे प्रमुख श्रीराम साळुंखे यांनी आंदोलनात सहभागी शिक्षकांना पाठिंबा दिला. मोर्चाच्या अग्रभागी महिला शिक्षक होत्या. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा फलक त्यांच्या हाती होता. उर्मिला शेंडगे, संगीता पाटील, सरिता गुरव, लता जठार, नीलम नांगरे ,पुरोगामी शिक्षक संघटनेचे प्रसाद पाटील, बी.जी. बोराडे, प्राचार्य दत्तात्रय घुगरे, जयसिंग पवार, आर. डी. पाटील, एस व्ही सूर्यवंशी, मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील, मिलिंद पांगिरेकर, एस. के. पाटील, डी बी पाटील कुडित्रेकर, बी. बी पाटील, एम आर पाटील, संजय सौंदलगे, शिवाजी गोंधळी, राजेश वरक, रविंद्र मोरे, बी एस मडिवाळ, उदय पाटील, विष्णू पाटील, सयाजी पाटील, संदीप पाथरे, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राजेंद्र कोरे कोजिमाशीचे दीपक पाटील, सचिन शिंदे, खाजगा प्राथामक शिक्षक महासघाच राजेंद्र कोरे कोजिमाशीचे दीपक पाटील, सचिन शिंदे, अनिल चव्हाण, शरद तावदारे, सुभाष खामकर, राजेंद्र पाटील, सचिन पाटील, काकासो भोकरे, श्रीकांत पाटील, शिक्षक संघ माजी आमदार शिवाजीराव पाटील गटाचे संभाजी बापट, बबन केकरे, बाळासाहेब कांबळे प्रशांत पोतदार डी.पी पाटील, मारुती दिंडे, श्वेता खांडेकर, सर्जेराव सुतार, संदीप पाडळकर अनिता निगवे, अनिता शिणगारे, शिक्षक संघ थोरात गटाचे विलास चौगले, रवी पाटील, सुनील पाटील, बाळासाहेब निंबाळकर, सुनील एडके, तानाजी मेढे, प्राथमिक शिक्षक समितीचे प्रमोद ताैंदकर यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
----------------------------
<
<


