कोल्हापूर पोलीस दलाला ६ शासकीय वाहनांची भेट

Kolhapur news
By -

   

           



               कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


      कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य राखीव पोलीस दलाची कार्यक्षमता वाढावी व त्यांचे काम अधिक सुलभ व्हावे, यादृष्टीने जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून पोलीस बल गट क्रमांक १६ साठी ६१ लाख ७ हजार रुपये मंजूर निधीतून राज्य राखीव पोलीस दलासाठी २ स्कॉर्पीओ व ४ बोलेरो अशा एकूण ६ शासकीय वाहनांचा लोकार्पण सोहळा  कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडला.


ही वाहने पोलिसांच्या दैनंदिन कामकाजासाठी, विशेषतः दुर्गम भागातील बंदोबस्त, गस्त, आपत्कालीन मदत व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. पोलिस दलाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही  जबाबदारी असून, भविष्यातही पोलीस यंत्रणा अधिक सक्षम, आधुनिक व जनतेच्या सेवेसाठी सज्ज राहील.


याप्रसंगी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता व SRPF समादेशक डॉ. प्रशांत अमृतकर आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


             --------------------