कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती परीक्षा 25 26 अंतर्गत 73 केंद्रावर दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी परीक्षा होणार असून सदर परीक्षेकरता 26479 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. परीक्षेकरता माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांचे मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रवेक्षक जयश्री जाधव या काम पाहत आहेत.
उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले,अजय पाटील, हनुमंत बिराजदार, विस्तार अधिकारी डी. ए. पाटील तसेच सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी व महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी काम पाहत आहेत.
सदर परीक्षेमध्ये दोन सत्रात पेपर घेतले जातात 90 गुणांसाठी 90 मिनिटाची परीक्षा असते. या परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती करता पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्याला केंद्र शासनामार्फत 15000 इतकी शिष्यवृत्ती नववी ते बारावी या तीन वर्षाकरिता दरवर्षी मिळते. तसेच महाराष्ट्र शासनामार्फत मराठा कुणबी मराठा जातीच्या पात्र विद्यार्थ्यांना 9600 इतकी शिष्यवृत्ती मिळते. जिल्ह्यामधील 73 केंद्रावर जिल्हा परिषदेच्या केंद्रप्रमुख पदवीधर अध्यापक महानगरपालिकेचे पर्यवेक्षक यांची केंद्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेचे व महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षक यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहेत यावर्षी पहिल्यांदाच मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्याकरिता एबीसीडी कोडप्रमाणे प्रश्नपत्रिका मिळणार आहेत इतर माध्यमाच्या विद्यार्थ्याकरिता फक्त एकच प्रश्नपत्रिका असेल त्यांना कोड दिला जाणार नाही सदर परीक्षेचे पूर्वतयारीचे कामकाज पूर्ण झाले आहे. या परीक्षेकरता शिक्षणाधिकारी माध्यमिक सुवर्णा सावंत यांचे मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रवेक्षक जयश्री जाधव या काम पाहत आहेत.
या परीक्षेकरिता माध्यमिक विभागातील उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले,अजय पाटील, हनुमंत बिराजदार, विस्तार अधिकारी डी. ए. पाटील तसेच सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी व महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी काम पाहत आहेत.
----------------------

