कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गोकुळचे शिल्पकार, माजी अध्यक्ष स्व. आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या 12 व्या स्मृतीदिनी गोकुळ दूध संघाच्या 20 लाख लिटर दूध संकलनपूर्तीनिमित्त अमृत कलश पूजन सोहळा तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ सोहळा राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत गोकुळ शिरगाव येथे पार पडला.
यावेळी गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, जेष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी), अरुणकुमार डोंगळे, शशिकांत पाटील-चुयेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, माणिकराव पाटील- चुयेकर, बाजार समिती सदस्य सुयोग वाडकर, जि.प. माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह गोकुळचे सर्व संचालक, कर्मचारी उपस्थित होते.
5 वर्षापुर्वी गोकुळच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व दिल्यास 20 लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठण्याचे आश्वासन दिले होते. हा टप्पा गाठून स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या कार्याला समर्पक असं कार्य आम्हाला करता आलं याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. या यशामुळे चुयेकर साहेबांच्या स्मृतीला अभिवादन तर करता आलेच पण शेतकऱ्यांना दिलेली शब्दपुर्ती करण्यात आला याचा अभिमान आहे. येत्या काळात 25 लाख दूध संकलनाचे उद्दिष्ठ गाठण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत असा विश्वास उपस्थितांना दिला.
----------------------------


