ही देवाभाऊ एकनाथ भाऊ युतीची लाट की जनतेने धरलेली विकासाची वाट : की तर राष्ट्रीय भावनेची पहाट.

Kolhapur news
By -

           


          कोल्हापूर न्यूज /  वि.रा.भोसले


  मनपा निवडणुकीत महायुतीने मिळवलेले प्रचंड यश म्हणजे मोठ्या शहरातील सुशिक्षित नागरिकांनी स्वीकारलेली विकासाची वाट असे म्हणावे लागेल. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे निस्पृह आणि धडाडीचे नेतृत्व हे या प्रचंड विजयाचे गमक आहे असे म्हणायला  हरकत नाही.


      महाराष्ट्रातील 29 पैकी 26 नगरपालिका म्हणजे चेष्टा नाही. त्यातही मुंबई वरचा विजय जितका महत्वाचा आहे तितकाच भारत वासियांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा आहे.त्याला कारणे आहेत.


    मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे.या शहराची 70 हजार कोटींची आर्थिक उलाढाल आहे. एखाद्या राज्याची सुद्धा एवढी नसते. आयात निर्यात, उदयोगधंदे, आणि आंतरराष्ट्रीय दळणवळण यामुळे या शहराचे महत्व अनन्य साधारण आहे. या शहरामुळेच देशाचा जी डी पी तिसऱ्या नंबर ला जाणार आहे.मुंबईचे महत्व ब्रिटिशांनी प्रथम ओळखले होते. तोपर्यंत मुंबई बेट याच नावाने या शहराची ओळख होती.


     बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला स्वतःची एक अस्मिता दिली. कोकणातील झाडून सगळे चाकरमाने मुंबईवरच अवलंबून होते. भारतातील एखादा माणूस परदेशीं जाऊन आला की त्याला फॉरेन रिटर्न असे म्हणून सन्मान दिला जायचा. तसा कोकणवासियांना मुंबई रिटर्न म्हंटले जायचे. मुंबई हे त्यांच्या उपजीविकेचे शहर होते.


   गेली 35 वर्षे या शहराची  सत्ता शिवसेनेच्या ताब्यात होती. बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा आजही आहे. त्यांनी स्वतः सत्तेची खुर्ची कधीच भूषविली नाही.

  त्यांच्या सद्याच्या वंशजानी मात्र मुंबई. अक्षरश: भोगली.


    कोहिनुर मिलचे हजारो कामगार देशोधडीला लागले ते राज ठाकरे यांच्या मुळेच. उद्धव ठाकरे यांना सत्ता फक्त आर्थिक करणासाठीच हवी होती. त्यामुळे बाळासाहेबांचा हिंदुत्ववाद त्यांनी अक्षरशः खुंटीला टांगून ठेवला व नको त्यांच्याशी युती केली.उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मठात तर आदित्य ठाकरे राहुल जींच्या मिठीत जाऊन बसले. शिवसैनिकांना ते रुचले नाही. तरीही  बाळासाहेबांच्या प्रेमाखातर त्यांनी या  बाळांना कसे तरी चालवून घेतले होते. 


    ही बाळे भलतीच हुशार निघाली. खुर्ची साठी त्यांनी औरंगंजेबाचे  उदात्तीकरण सुरु केले. मनपा निवडणुकीत तर त्यांनी बुरखा वाल्या उमेदवारांना उतरवले. इंग्लंड, न्यूयार्क नंतर आता मुंबई हे शहर सुद्धा हिरव्या झेंड्याखाली जाते की काय असे वाटू लागले तेंव्हा  देवाभाऊ आणि  एकनाथ भाऊ या हिंदुत्ववादी नेत्यांनी कंबर कसली. राष्ट्र प्रथम या भावनेतून ते कामाला लागले. मुंबई महाराष्ट्राची तर आहेच पण सुंदर भारत मातेच्या कपाळावर रूळणारी ती बट आहे याची जाणीव त्यांनी जणू तमाम मुंबईकरांना करून दिली.


   मुंबईत मराठी आहेत तसें देशातल्या सर्व राज्यातील लोक आहेत. ते सगळे भारतीय आहेत. या देशावर नितांत प्रेम असणारा नागरिकच या मुंबईचा महापौर असला पाहिजे व हक्काचा मराठी  माणूसच असला पाहिजे हे या दोघांनी मुंबईकरांच्या गळी उतरवले.


   सत्तेसाठीच राजकारण करणाऱ्या ठाकरे पवार गांधी या घराणेशाहीला हा फार मोठ्ठा धक्का आहे.

   ई व्ही एम, मतचोरी, बोटावरची शाई या टिकल्या लावून राहुल, राज, उद्धव, आदित्य, संजय आता गल्लीबोळात सांगत सुटतील. "आम्हांला यांनी फसवलं की हो."या संक्रांत संक्रमाणाला  देवाभाऊ एकनाथ भाऊ युतीची  लाट म्हणा किंवा शहरी जनतेने सुद्धा ग्रामीण जनतेबरोबर धरलेली राष्ट्रविकासाची वाट म्हणा.ही राष्ट्रीय भावनेची पहाट मात्र नक्की आहे.


       ------------------------------------