कोल्हापूर न्यूज नेटवर्क
अन्नपूर्णा कारखान्याच्या उभारणीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी मदत केली. त्यावेळी संजयबाबांनी त्यांना शब्द दिला होता की येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, तो शब्द आम्ही पाळला. त्यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी दोन जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समितीच्या जागा देतो, असा शब्द दिला होता. त्यांनी देखील तो शब्द पाळावा, असे आवाहन गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी केले
ते पुढे म्हणाले , राज्यातील विधानसभा ,नगरपालिका आणि महानगरपालिकेतील घवघवीत यशानंतर जनमताचा कौल भाजपच्या बाजून आहे हे सिद्ध झाले आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडणुकांमध्येही भाजप असेच घवघवीत यश मिळवेल यात शंका नाही या दोन्ही निवडणुकांना भारतीय जनता पक्ष आत्मविश्वासाने सामोरे जाईल असे प्रतिपादन अंबरिषसिंह घाटगे यांनी व्यक्त केले.
बस्तवडे फाटा ता. कागल येथे भारतीय जनता पार्टी चा चिखली व कापशी जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी माजी जि.प.सदस्या सुयशा घाटगे यांच्यासह भाजप पदाधिकारी, गटनेते , नानीबाई चिखली व सेनापती कापशी या मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------



