मुरगूड मध्ये हजरत गैबी पीर उरूस १४ जानेवारी पासून सुरू: गलेफ कीर्तन, ऑर्केस्ट्रा,हळदीकुंकू यासह विविध कार्यक्रमांचा समावेश.

Kolhapur news
By -

 

            


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क   

     

दरवर्षीप्रमाणे मुरगूड येथे भव्य असा गैबी पीर उरूस १४ जानेवारी पासून सुरू होत आहे.दि. १८ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या  उत्सवात  गलफ,कीर्तन, ऑर्केस्ट्रा आणि महिलांसाठी हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.दिनांक १५जानेवारी रोजी भर उरूस असून त्यादिवशी गलफ अर्पण कार्यक्रम असेल.


हिंदू मुस्लिम  ऐक्य व सद्भावना यांचे सांघिक  दर्शन या उत्सवात  पहायला मिळते .शिवाय अबालवृद्धांना मनोरंजनाची पर्वणी लाभणार आहे.मुलामुलींसाठी आकर्षक खेळप्रकार,युवकांसाठी थरारक मोटारसायकल मौतका कुआं , फिरते पाळणे, असे सगळे कांहीं या उरूस महोत्सवात पहायला मिळणार आहे. असे गैबी पीर उरूस समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर न्यूज शी बोलताना सांगितले.समितीचे अध्यक्ष अमित भोई,उपाध्यक्ष,समाधान दरेकर,सचिव चंद्रकांत जाधव , खजानीस रविराज परीट यांचे सह सदस्य राजेश सोरप,विनायक वागणेकर,अनिल रणवरे,शिवाजी गोंधळी,विठ्ठल भुते,महादेव गोंधळी, आबीद जमादार,राजरतन पाटील,बाजीराव रणवरे,विजय गोधडे,चंद्रकांत कुंभार यांनी उरूस उरुस  नियोजनात विशेष भाग घेतला.


    वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ, माजी खासदार संजयदादा मंडलिक, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, गोकुळ चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील,  माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील,नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील ,राजेखान जमादार (माजी नगराध्यक्ष) तसेच नवनिर्वाचित सर्व नगरसेवक यांनी उरूस समितीस बहुमोल सहकार्य केले असून नगरसेविका सौ.गीतांजली आंगज यांनी  विशेष सहकार्य केले असल्याचे सचिव प्रा.चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.

   

                   --------------------