पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस व विद्यार्थी मैत्री झाली दृढ

Kolhapur news
By -

                 


            कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


    पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी आदर निर्माण व्हावा तसेच पोलीस व विद्यार्थी यांच्यातील मैत्री अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


महिला दक्षता विभागाच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या नेतृत्वाखाली शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशन व निर्भया पथकाच्या संयुक्त विद्यमाने  राजेंद्र विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, हालोंडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस खात्यातील विविध विभाग, त्यांचे कार्य, पोलीस ठाण्याची रचना व कर्तव्यांची माहिती देण्यात आली. तसेच शालेय वयात येणाऱ्या चांगल्या-वाईट प्रसंगांना कसे सामोरे जावे, वेळीच सावधगिरी कशी बाळगावी, व्यसनाधीनतेपासून दूर कसे राहावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी मुलींना स्वसंरक्षणाचे महत्त्व, मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या वापराबाबत घ्यावयाची काळजी याविषयीही जागरूक करण्यात आले. कोणताही त्रास किंवा अडचण उद्भवल्यास पालक, शिक्षक किंवा निर्भया पथकाच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधावा, तसेच तात्काळ मदतीसाठी डायल ११२ किंवा १०९१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. 


                 -----------------------