कोल्हापूर न्यूज नेटवर्क
राष्ट्र सेवेचे संस्कार हे घरापासून सुरू झाले पाहिजेत अशी शिकवण राजमाता जिजाऊ मांसाहेबांनी दिली असे उद्गार मुरुगूडच्या नगराध्यक्षा सौ .सुहासिनीदेवी पाटील यांनी काढले.
मुरगूड नगर परिषदेसमोरील शिवतीर्थावर राजमाता जिजाऊमांसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी झाली .त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की जिजाऊ मांसाहेब यांनी शिवरायांना घडविले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली.स्वामी विवेकानंदांनी ज्ञानाची पताका जगभर फडकविली.
नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी पाटील व उपनगराध्यक्षा श्रीमती रेखाताई मांगले यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
मुरगूड च्या शिवभक्त संघटने मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.स्वागत शिवभक्त सर्जेराव भाट यांनी केले .प्रास्ताविक मुरगूड पत्रकार संघाचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी केले.आभार हाजी धोंडीराम मकानदार यांनी केले.
नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश वाळुंज ,नगरसेवक सुहास खराडे,शिवाजीराव चौगुले, राहुल शिंदे ,सुनील रणवरे इत्यादीसह प्रतिष्ठित नागरीक व शिवप्रेमी युवक उपस्थित होते.
------------------------------


