एआयला कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणता येणार नाही - सम्राट फडणीस : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे पुरस्कार वितरण

Kolhapur news
By -

 

          


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


एआयला कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणता येणार नाही. पण प्रत्येक पत्रकाराला एआयचे ज्ञान आत्मसात करावे लागणार आहे. असे मत दैनिक सकाळ पुणे चे संपादक सम्राट फडणीस यांनी व्यक्त केले. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या दशकपूर्ती व पत्रकार दिन समारंभात ते बोलत होते. लोकसभा संसद सदस्य शाहू छत्रपती हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संजय घोडावत विद्यापीठाचे संचालक डॉ. विराट गिरी, बी न्यूज चे कार्यकारी संपादक ताज मुल्लानी व मनोज साळुंखे हे प्रमुख उपस्थित होते.


श्री. फडणीस म्हणाले, तंत्रज्ञान आत्मसात न करणारे या क्षेत्रातून बाहेर पडतील. तंत्रज्ञानामुळे आपले काम निश्चितच सोपे झाले आहे. पण पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोकादायक ठरेल. तंत्रज्ञानाचा वापर एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना एआय कार्यशाळेसाठी आमंत्रित करावे असे त्यांनी सांगितले. 


शाहू छत्रपती यांनी माध्यम प्रतिनिधींनी आपली भूमिका चोख बजावावी. कोल्हापुरच्या पत्रकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपला नावलौकिक मिळवला आहे. तसेच बदलते तंत्रज्ञान आत्मसात करत पत्रकारांनी यशाच्या दिशेने वाटचाल करावी असे त्यांनी सांगितले. 


एआयची भीती बाळगण्याची गरज नाही. एआय मुळे कुणाच्याही नोकऱ्या जाणार नाही. मात्र एआय तंत्रज्ञानाचा वापर करता आला नाही म्हणून नोकऱ्या जातील असे घोडावत विद्यापीठाचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी सांगितले. 


एआय मुळे सर्वांचेच काम सोपे झाले आहे. सर्वच क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे सर्व पत्रकारांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करावे असे बी न्यूज चे कार्यकारी संपादक ताज मुल्लानी यांनी सांगितले.


यावेळी ज्येष्ठ संपादक मनोज साळुंखे यांना जीवनगौरव, राहुल बामणे यांना उत्कृष्ट उपसंपादक, संजय कुडाळकर यांना उत्कृष्ट पत्रकार ( इलेक्ट्रॉनिक मीडिया ), अशोक पाटील यांना उत्कृष्ट पत्रकार, बाळासाहेब कवडे यांना उत्कृष्ट सेवा पुरस्कार, दीपक मांगले यांना जिल्हा उत्कृष्ट डिजिटल मीडिया पुरस्कार व साताप्पा उर्फ बंटी पाटील यांना उत्कृष्ट छायाचित्रकार असे पुरस्कार देण्यात आले.


           तालुकास्तरीय पुरस्कार


 नरेंद्र बोते, संग्राम पाटील, युवराज पाटील, दिलीप निकम, शब्बीर मुल्ला, मुन्नाभाई नदाफ, प्रवीण पवार, शिवाजी पाटील, रामनाथ डेंगळे, रामचंद्र चौगले, अशोक मोहिते, बाजीराव पाटील, नथुराम डवरी, निंगाप्पा बोकडे, अजित यादव, सचिन कळेकर, संभाजी सुतार व विठ्ठल नाईक यांना तालुकास्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


खासदार शाहू छत्रपती व सम्राट फडणीस यांना श्री महालक्ष्मीची प्रतिमा देऊन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी त्यांचा सत्कार केला. जागल्या स्मरणिकेचे संपादक रवींद्र पाटील यांनी स्वागत केले. संघटनेचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रास्तावित केले.सचिव सुरेश पाटील यांनी अहवाल वाचन केले. 


यावेळी सदानंद कुलकर्णी, दगडू माने, भास्कर चंदनशिवे, धनाजी गुरव, निवास वरपे, बाळासाहेब चोपडे, प्रकाश तिराळे, सतीश पाटील, सागर लोहार, सर्जेराव निर्मळे, सलीम खतीब, विद्याधर कांबळे, अमित खांडेकर, धनंजय पाटील, अनिल तराळ आदी उपस्थित होते. पुनम चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांनी आभार मानले. 


अतिग्रे : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांसोबत, खासदार शाहू छत्रपती, दै. सकाळ पुणे चे संपादक सम्राट फडणीस, ताज मुल्लानी, डॉ. विराट गिरी, मनोज साळुंखे, सुधाकर निर्मळे आदी.


       .....................................