शिवछत्रपतींना अभिवादन करून मुरगूड येथे सौ.सुहासिनीदेवी पाटील यांचा पदग्रहण सोहळा.

Kolhapur news
By -

 

                     


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


         शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुरगूड शहरात नगराध्यक्ष पदाचा  व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा आज संपन्न झाला.लोकनियुक्त नगराध्यक्षा सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील यांनी नगरपरिषदेच्या समोर असलेल्या शिवतीर्था वरील शिवछत्रपतींच्या स्मारकाला अभिवादन करून हार अर्पण केला व  नंतर नगराध्यक्ष कक्षात प्रवेश केला.

  

  त्या आधी ग्राम दैवत अंबाबाईला वंदन करून त्यांनी आईची ओटी भरली व तेथून कार्यकर्त्यांसमवेत नगर परिषद कार्यालयाकडे रवाना झाल्या.मार्गावर असलेल्या स्व.विजयमाला मंडलिक यांच्या प्रतिमेस हार अर्पण केला.तेथून स्व.विश्वनाथराव पाटील सहकारी बँकेतील  विश्वनाथ आण्णांच्या पुतळ्याला वंदन करून हार घातला.शिवराज हायस्कुलच्या प्रांगणात असलेल्या स्व.सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृति स्थळाला सुद्धा त्यांनी भेट दिली व फुले वाहिली.त्यानंतर त्यांनी नगरपरिषदेत येऊन पदग्रहण केले.शिवछत्रपतींच्या जयजयकाराने वातावरण  दुमदुमून गेले . 


माजी खासदार संजयदादा मंडलिक व माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे) भाजपा युतीच्या त्या उमेदवार होत्या . त्यांच्या पद ग्रहण सोहळ्याचे नेतृत्व ॲड.विरेंद्रसिंह मंडलिक व दिग्विजयसिंह पाटील यांनी केले.गटनेतेपदी सुहास खराडे यांची निवड झाली आहे.उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य नियुक्त्या उद्या होण्याची शक्यता आहे असे समजते.


     सर्व गटांचे कार्यकर्ते व नगरसेवकांचे समर्थक यांच्या मुळे परिसराला लोकशाहीच्या  ओजस्वी उत्सवाचे स्वरूप आले होते.



     



            ------------------------------