कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कागल तालुक्यातील शाहू शिक्षक आघाडीने सोलापूर जिल्ह्यातील महापुराने अति नुकसान झालेल्या शिना नदी काठावरील करमाळा तालुक्यातील विविध शाळांना शैक्षणिक किट वाटप केले.
यामध्ये करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावंडे वस्ती,वि .मं. खांबेवाडी, जि.प.प्राथमिक शाळा फडतरे वस्ती,निंबोरी.जि.प.प्राथमिक शाळा निळवस्ती ,जि.प.प्राथमिक शाळा दिलमेश्वर , जि.प.प्राथमिक शाळा तळेकर वस्ती नं.2 , जि.प.प्राथमिक शाळा कोळगाव या शाळांचा समावेश केला होता.
यावेळी करमाळा तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी टकले साहेब, बाळासाहेब निंबाळकर सर (माजी चेअरमन व विद्यमान संचालक कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक), सुनील पाटील सर (माजी चेअरमन जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी कोल्हापूर व जिल्हा सरचिटणीस शिक्षक संघ थोरात गट कोल्हापूर), के. डी. पाटील सर, संजय दाभाडे सर, जितेंद्र कुंभार सर (चेअरमन सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतसंस्था) सर पिराजीराव पतसंस्थेचे संचालक प्रदीप बुधाळे-पाटील सर,बाळासाहेब तांबेकर सर,बाळू खामकर सर,पी. आर. पाटील सर,हरिश्चंद्र साळुंखे सर,ए .एल .कांबळे सर, विठ्ठल पाटील सर उपस्थित होते.
शैक्षणिक किट वाटपासाठी करमाळा तालुका पतसंस्थेचे चेअरमन अरुण चौगुले, दीपक कणसे, तात्यासाहेब जाधव, बनसोडे सर व करमाळा तालुका पतसंस्थेचे सर्व संचालक यांचे लाख मोलाचे सहकार्य लाभले.
------------------------------




