कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आज अमावस्या. तशी ती प्रत्येक महिन्यालाच येते. दूर दूर वरून बाळू मामांचे भक्त अदमापूर ला येतात. त्यामुळे मंदिर परिसरात वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. जणू वाहनांचीच जत्रा भरली आहे.ही समस्या दर महिन्याची असते. वाहनतळ नियोजन (पार्किंग ) म्हणावे तसे नसल्याने ही कोंडी अशीच वाढत राहणार आहे.
मंदिराच्या पश्चिम बाजूला म्हणजे मुदाळ तिट्ट्या च्या बाजूला एक वाहन तळ आहे. पूर्वेकडून म्हणजे मुरगूड च्या बाजूने सुद्धा वाहने येतात.. त्या बाजूला पण एक प्रशस्त वाहनतळ असायला पाहिजे.
Mandir प्रशासनाने या कडे घालायला पाहिजे. खाजगी जमीन मालक याचा गैरफायदा घेऊन स्वतःच्या जागेत किंवा भाड्याच्या जागेत वाहनतळ तयार करतात. त्याचे दर ही न परवडणारे असतात. त्यामुळे बरीचशी वाहने रस्त्याच्या बाजूला कुंपणा कडेने लावली जातात. बस, ट्रॅक्टर, ट्रक यासारखी मोठी वाहने या कोंडीत फसून तास ते दोन तास अडकून बसतात.
शिर्डी, शेगाव, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रा सारखीच आदमापूर तीर्थाला गर्दी असते. अत्यंत देखणे मंदिर व नित्य दर्शनाची व प्रसादाची चांगली सोय असून सुद्धा दर महिन्याच्या वाहतूक कोंडी मुळे भाविकांचे अतोनात हाल होत आहेत.
मंदिर प्रशासनाने या कडे गांभीर्याने लक्ष देऊन मुरगूडच्या बाजुला एक प्रशस्त वाहनतळ तयार केला पाहिजे. मुख्य रस्त्याला लागून मंदिर असल्याने वाहतूक नियोजन फार महत्वाचे ठरले आहे.
----------------

