कोल्हापूर न्यूज / वि.रा. भोसले
सद्या सोशल मीडिया जोरात आहे. निवडणूक प्रचारात सुद्धा सोशल मीडियाने चांगली कामगिरी केली आहे. व्हिडीओ सह बातम्या, माहिती आणि चांगले संदेश समाजा पार्यंत पोचवण्याचे काम या माध्यमावर जोरात चालते.सद्या ते एक प्रभावी प्रसार माध्यम आहे यात शंकाच नाही.
या माध्यमावर सद्या एका भस्मासुराने थैमान घातले आहे. हा असूर ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो माणूस भस्म होऊन जायचा. भगवान शंकराने त्याला तसा वर दिला होता. त्याचे थैमान अति झाले तेंव्हा शंकरानेच एक नर्तिका त्याच्याकडे पाठवली. ती नर्तिका जसे नृत्य करेल त्या प्रमाणे तो नृत्य करू लागला. एका क्षणी नर्तिके ने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला तसा असुरा ने सुद्धा स्वतः च्या डोक्यावर हात ठेवला व तो स्वतःच भस्म होऊन गेला.ही झाली एक अख्यायिका.सोशल मीडियावरचा भस्मासूर म्हणजे सद्या यू ट्यूब सारख्या माध्यमावर येणारे रील्स होय. हे रील्स ए आय जनरेटेड असतात. त्या बनावाट व्हिडिओ ला फॉलो केले कीं त्यांना त्याचे पैसे मिळतात. फॉलोवर्स जितके जास्त तितके पैसे जास्त.पैसे मिळवण्यासाठी रील्स मधून घाणेरडे प्रकार सुरु आहेत.मोठ्या सेलेब्रे्टींची टिंगल टवाळी करणारे आणी अश्लील दृश्य दाखवणारे रील्स जास्त असतात.कांही उदाहरणे पाहू.सलमान खान,ऐश्वर्या राय, शाहरुख खान, काजोल, अमिताभ रेखा यांची प्रणय दृशे, कथा वाचक बाबा बागेश्वर व जया किशोरी यांचा विवाह,वगैरे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचा डान्स नरेंद्र मोदी आणि इटालिच्या पंतप्रधान जोर्जा मेलोनी यांचे प्रणय दृश्य
या शिवाय हिंदू देवदेवतांची विटंबना करणारी अनेक चित्रे व व्हिडिओ दाखवले जातात.असल्या व्हिडीओना पहावें यासाठी ग्राहक प्रेक्षकांच्या वर भावनिक मारा सुद्धा केला जातो.उदा. जो लाईक नही करेगा वह पापी होगा. अशी डायलॉग बाजी पहायला मिळते.लोकशाही स्वातंत्र्याचा असा वापर करणे म्हणजे भावनिक कत्तल होय. पैशासाठी कोणत्याही थराला जाणे हे योग्य नाही.ही भस्मासूरी वृत्ती आहे असेच म्हणावे लागेल. विशेषतः मुले आणि युवकांच्या विवेक शक्तीला भस्म करू पहाणारी हीं एक विकृतीच म्हणावी लागेल.यासाठी कायदा ही झालाय. पण कायद्याला मारो गोली असा मागरूर पणा वाढत चाललाय. त्याकरिता कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यु ट्यूब चा शंकर जागा करणे सुद्धा गरजेचे आहे.सामाजिक आणीबाणी समजून या रील्स वर बंदी घालणे अत्यंत गरजेचे आहे. या रील्स मुळे बालमनातल्या विवेक आणी विचारांची अक्षरशः कत्तल होत आहे याचा अत्यंत गंभीर्याने विचार झाला पाहिजे.ए आय चा वापर कृषी तंत्रज्ञान, सेनादल, उद्योगधंदे,व अन्य अनेक विकास कामात करता येतो. तसे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.जपान ने सोशल मीडियाचा देशाच्या विकासाकरिता फार चांगला उपयोग करून घेतला आहे. दुसऱ्या महायुद्धा च्या राखेतून झेप घेतलेला हा देश आपले प्रेरणा स्थान ठरावा.
सोशल मीडिया वरील अश्लील, बदनामीकारक खोटे रील्स म्हणजे रिअल ची कत्तल करणारा एक राक्षस आहे असे समजून अशा रील्स वर बंदी घातलीच पाहिजे.
-------------------------------

