कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदी श्रीमती रेखाताई आनंदा मांगले यांची एकमताने निवड झाली.तसेच स्विकृत सदस्य म्हणून सुनील गणपती मंडलिक व राहुल शामराव शिंदे या दोघांची निवड झाली आहे.मिरवणूकीने त्यांचे अभिनंदन व स्वागत करण्यात आले.
माजी खासदार संजय मंडलिक व माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपा युतीची सत्ता नगरपरिषदेवर स्थापित झाली असून मुरगूडच्या सर्वांगीण विकासाचा वसा आम्हीं घेतला आहे असे मनोगत त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
पाणी प्रश्न,रस्ते,सोलर वीज ,वृक्षारोपण,व शहरातील सौंदर्य स्थळे यांना अधिक प्राधान्य देण्यात येईल.आम्हांला वरिष्ठांचे खंबीर नेतृत्व लाभले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या वैभवासाठी काम करत राहू.युवकांसाठी रोजगार निर्मिती व्हावी म्हणून कांहीं उपयुक्त उद्योग व व्यवसाय शहर परिसरात सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत राहू असेही या नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
-----------------------------------------






