स्वामी समर्थांच्या पालखी चे व्यापारी नागरी पतसंस्थेत उत्साही स्वागत.

Kolhapur news
By -

 

              


      

                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


       

अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या पालखीचे मुरगूड येथील व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेत  भक्तिमय उत्साहात स्वागत करण्यात आले.


    "भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ".

    असे स्वामी समर्थ यांचे आशीर्वचन आहे.

   भक्तांच्या मनात केवळ भक्तिभावच नव्हे तर संपूर्ण सकारात्मकता निर्माण करणारे असे हे आशीर्वचन आहे.त्यामुळेच समर्थांचे लाखो श्रद्धाळू भक्त देशभर पहायला मिळतात.


   मुरगूड येथे व्यापारी नागरी पतसंस्थेचे सभापती किरण गवाणकर ,उपसभापती प्रकाश प्रकाश सणगर आणि कार्यकारी संचालक सुदर्शन हुंडेकर यांनी संस्थेच्या वतीने पूजा केली व भाविकांचे स्वागत करून प्रसाद वाटप केले.




         ------------------------------------