कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली (ता. कागल) येथील श्रीमती गौसबी दावन मलंगफकीर यांचे शेतजमीनीत महापुराचे पाण्याने ग्रामपंचायत कडील कचरा डेपोमधील कचरा महापुराच्या काळात वाहून जात असलेने पिकाचे नुकसान होत असलेने त्यांनी चिखली ग्रामपंचायतीकडे कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्या संदर्भात मागणी केली आहे .
ग्रामपंचायत कडील स्मशानभूमीलगत असलेल्या कचरा डेपो मधील कचरा महापुराच्या पाण्याने वाहून जावून, लगत असलेले गाैसबी मलंगफकीर यांचे शेत जमीनीत जावून पडत असलेने, ऊस पिकाचे नुकसान होते. त्यामुळे ऊस पिकाच्या होणाऱ्या या नुकसानीची गेल्या पाच वर्षाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ही त्यांनी निवेदनाद्वारे चिखली ग्रामपंचायतीकडे केली आहे. चार महिन्यापूर्वी त्यांनी निवेदनाद्वारे मागणी करून ही अद्याप ग्रामपंचायतीकडून दखल न घेतल्याने तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण दाद मागणार असल्याचे गौसबी मलंगफकीर यांनी 'कोल्हापूर न्यूज' शी बोलताना सांगितले.
ग्रामपंचायत करणार उपाययोजना
चिखली ग्रामपंचायत गावात संकलित केलेला कचरा हा ग्रामपंचायत हद्दीमध्येच टाकते. फक्त वेदगंगा नदीला महापूर आला तरच कचरा डेपोतील कचरा वाहून संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जातो. कचरा गाडी सुरू होऊन जवळपास तीन वर्षे झाले आहेत, या तीन वर्षाच्या काळात दोन वेळाच पूर आला आहे. महापुराच्या काळात कचरा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊ नये म्हणून संरक्षक भिंत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून बांधण्याचे नियोजन आहे त्यामुळे कचरा शेतामध्ये जाणार नाही. तसेच चिखली व खडकेवाडा या दोन गावासाठी भैरवनाथ परिसरातील वनीकरणांमध्ये घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी कागलच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे , त्या ठिकाणी घनकचरा प्रकल्प झाल्यास कचऱ्याची विल्हेवाट तिकडेच लावली जाईल, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्यांना कचऱ्याचा त्रासच होणार नाही.
युवराज कुंभार , सरपंच चिखली
------------------------------------

