देशभक्तीपर गीतांवर सामुहिक कवायत संचलनाचे हाेणार आयोजन -माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत

Kolhapur news
By -

            



               कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


         महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व आयुक्त सचिंद्र  प्रताप सिंग यांच्या  व्हीसीतील सूचनेनुसार कोल्हापूर जिल्हयात ७७ व्या प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी  देशभक्तीपर गीतांवर सामुहिक कवायत संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे.


  सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व  उपशिक्षणाधिकारी यांनी 3 ते ४ वेळ व्हीसी घेऊन जिल्हयातील सर्व माध्यमांच्या शाळेत देशभक्ती गीतांवर सामुहिक कवायत संचलनाचे नियोजन केले आहे. 


   या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पोलीस परेड ग्राऊंड येथे होलीक्रॉस व दत्ताबाळ येथील २००० विद्यार्थ्यांची सामुहिक कवायत होणार आहे. तसेच १२ तालुक्यामध्ये २ महानगर पालिका विभागात साधारणपणे ३ ते ४ ठिकाणी आसपासच्या जिल्हा परिषद शाळा एकत्र कवायतीचे नियोजन ४० ठिकाणी करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याचे नियोजन पोलीस परेड ग्राऊंड येथे आहे. तसेच त्या ठिकाणी उषाराजे हायस्कूल यांचा गोंधळ कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमाचा देशस्तरावर तीसरा क्रमांक आल्याने त्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हातकणंगले तालुक्यातील मिणचे येथील आदर्श गुरुकुल मध्ये ५००० विद्यार्थी यांचा सामुहिक कवायत कार्यक्रम होणार आहे.


तसेच वारणा विद्यालय येथे ३००० विद्यार्थी तीन शाळा एकत्र करून सामुहिक कवायत संचालनाचा कार्यक्रम घेणार आहेत. अशी माहिती प्रसिद्धीस माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दिली आहे. 


          -------------------------------------