कोल्हापूर न्यूज नेटवर्क
ज्ञान आणि तना मनाच्या सक्षमते मुळे उद्याची पिढी उज्वल होईल.स्वतः ज्ञान मिळवण्याचा आनंद अपूर्व असतो.स्वतः पुस्तके डिजिटल मीडिया वापरून शोधलेले ज्ञान शाश्वत राहते.पुढील काळात मुले ज्ञान मिळवण्याचा "शहाणपणा" आत्मसात करण्यासाठी शाळेत येतील.मुले ज्ञान शोधू लागतील.ज्ञान कौशल्य मिळवण्याच्या पद्धती मार्ग आणि ज्ञाना सह टेक्नॉलॉजीने सज्ज असलेला शिक्षक व शाळा मुलांची ज्ञानाची भूक भागवतील."असे मौलिक मार्गदर्शन सहा. शिक्षण संचालक डॉ.गणपती कमळकर यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रमात बोलत होते. व्यंकटेश्वरा मल्टीपर्पज फाउंडेशन कोल्हापूरचे चेअरमन इंद्रजीत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते
यावेळी प्रवीणसिंह पाटील म्हणाले विद्यालयाच्या स्थापनेपासून आज पर्यंत या शाळेची गुणवत्ता सातत्याने वाढतच राहिली आहे. येथे येणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये भरच घातली. या शाळेत राजकारण येऊ दिले नाही. पुढील काळात ही अशीच घोडदौड कायम ठेवावी. शाळेच्या ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले जाईल.
याप्रसंगी वार्षिक क्रीडा स्पर्धेत यशस्वीतांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. एन.एम एम एस परीक्षेत यशस्वी 67 , शिष्यवृत्ती प्राप्त 9 व अन्य क्षेत्रात प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी सहाय्यक शिक्षक संचालक कोल्हापूर पदी निवड झाल्याबद्दल डॉ. गणपती कमळकर यांचा प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते, तर व्यंकटेश्वरा मल्टीपर्पज फाउंडेशन च वतीने पाच टि व्ही संच प्रदान केल्याबद्दल चेअरमन इंद्रजीत देशमुख यांचा उपमुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य एस पी पाटील यांच्याकडे यावेळी इंद्रजीत देशमुख यांनी पाच टि.व्ही संच प्रदान केले.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य एस. पी. पाटील यांनी केले. यावेळी सतीश पाटील, उपमुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी पर्यवेक्षक एस.डी.साठे, उप प्राचार्य व्ही जी घोरपडे एस एस कळंत्रे, एम.डी खाटांगळे पी एस पाटील, एस एस कोंडेकर, ए.एच.भोई, एन एन गुरव एस जे कटके आर जी पाटील एस.डी कुंभार, वाय इ देशमुख एस आर भोई, एस पी बाईत, बी वाय मुसाई, व्ही एस सूर्यवंशी के एस पाटील जी व्ही पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ए.एन. पाटील तर आभार एम.बी.टेपुगडे यांनी आभार मानले.
-------------------------------




