वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मुरगूडच्या साई संकुलची अपेक्षा पाटील सुवर्णं पदकाची मानकऱी

Kolhapur news
By -

            



         कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


     लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय SAI कुस्ती संकुल, मुरगुड ची मल्ल अपेक्षा पाटील हिने गाजियाबाद, उत्तरप्रदेश येथे सुरू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय फेडरेशन कप कुस्ती स्पर्धेत प्रेक्षणीय कुस्त्या करत 65 किलो वजन गटात सुवर्णपदकाची कमाई केली.


                     कुस्त्यांचा उल्लेख 


अपेक्षाने पहिल्या फेरीत मध्य प्रदेशच्या नुपूर प्रजापती याच्यावर चितपटीने विजय मिळवत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला 

व उत्तर प्रदेशच्या भूमी यादव वर 10-00 गुणाधीक्याने विजय मिळवत  तिने अंतिम फेरीत प्रवेश केला व अंतिम फेरीत आंतरराष्ट्रीय पदक विजेती हरियाणाच्या वर्षा हिच्यावर 06 गुणांची कमाई करत कलाजंग या डावावर चितपट करून ऐतिहासिक कामगिरी करत  सुवर्णपदकाची कमाई केली.तसेच या स्पर्धेत नेहा चौगले हिने 50 किलो वजन गटामध्ये कांस्यपदकाची कमाई केली


                  कुस्त्यांचा उल्लेख 


नेहाने नागालँड,ओडिसा या राज्यातील महिला मल्लांवर विजय मिळवत सेमी फायनल मध्ये हरियाणाच्या स्वीटी बरोबर   पराभवाचा सामना करावा लागला व नंतर कास्यपदकाच्या लढतीत नेहाने राजस्थानच्या कोमल वरती एकतर्फी विजय मिळवत कांस्यपदकाची कमाई केली . नेहा सध्या मुंबई येथे वेस्टर्न रेल्वे मध्ये T C या पदावरती कार्यरत आहे


        ------------------------------