कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शासनाच्या 15 मार्च 2024 च्या संच मान्यता आदेशामुळे शेकडो वर्ग शिक्षकाविना राहणार आहेत. त्यामुळे वाडी वस्तीवरील सर्वसामान्य, गोरगरीब बहुजनांचे शिक्षण बंद होणार. त्यासाठी शाळा वाचवा- शिक्षण वाचवा अभियानामार्फत शिक्षण हक्कयात्रा व शिक्षण हक्क परिषद आयोजित केलेली आहे. या शिक्षण हक्क यात्रेत व परिषदेत कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघांने ताकतीने सहभागी होण्याचा निर्णय व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार जयंत आसगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुख्याध्यापक संघ ,विद्या भवन येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
ही शिक्षण हक्क यात्रा 26 फेब्रुवारी रोजी चंदगड येथून सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सुरू होणार. तेथून तहसीलदार कचेरीपर्यंत रॅली निघून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. तेथून ती दुपारी आजरा येथे येणार आहे. तेथे सर्व पालक,नागरिक यांच्या सहभागाने आजऱ्यात रॅली काढण्यात येणार. तेथून यात्रा भुदरगड या ठिकाणी मुक्कामास येणार. दिनांक 27 रोजी भुदरगड येथून राधानगरी येथे जाणार त्यानंतर यात्रेचा मुक्काम कोल्हापूर येथे होणार. दिनांक 28 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ही यात्रा छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ, टाऊन हॉल शेजारी, नर्सरी बाग या ठिकाणी येणार. या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण हक्क परिषदेत होणार. या सर्व लढ्यात जिल्ह्यातील शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विद्यापीठीय शिक्षक संघटना सहभागी होणार आहेत.
हे आंदोलन गोरगरिबांच्या शाळा वाचवण्यासाठी ,त्याचे शिक्षण वाचवण्यासाठी होणार असल्याने सर्वांना शिक्षण मिळावे, वस्ती ते शाळा असावी, प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक असावा, शाळा सर्व सुविधानीयुक्त असावी या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन ताकतीन होणे आवश्यक आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाजाने सहभागी व्हावे असेही आव्हान यावेळी करण्यात आले .या आंदोलनामध्ये संस्थाचालक, मुख्याध्यापक ,शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी ,वाडी वस्तीवरील व जिल्ह्यातील सर्व पालकांनी, शिक्षणप्रेमी नागरिकांनी ,शाळा व्यवस्थापन सदस्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील ,विजय देवणे ,संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष शारंगधर देशमुख, शिक्षक नेते दादा लाड, सुधाकर निर्मळे, सुधाकर सावंत,उमेश देसाई ,राजेश वरक, राजेंद्र कोरे, प्रभाकर हेरवाडे, उदय पाटील,प्रसाद पाटील, मनोहर जाधव, शिवाजी भोसले, इरफान अन्सारी, रवींद्र मोरे ,रियाज शिकलगार ,विजय सुतार, संदीप पात्रे ,सूर्यकांत बर्गे ,इत्यादी विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.
बैठकी प्रसंगी शिक्षक आमदार जयंत आसगावकर शेजारी व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड,सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, संस्थाचालक संघ अध्यक्ष तथा नगरसेवक शारंगधर देशमुख,शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन राहूल पवार, सचिव आर. वाय. पाटील आदीसह शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेचे पदाधिकारी
--------------------------


