शिक्षण मंत्री ना .दादा भुसे यांच्याकडून मुख्याध्यापक अर्जित रजा रोखीकरणावर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन

Kolhapur news
By -

 

               


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क  

    

            राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकाच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत लवकरच मार्ग काढू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नाम . दादा भुसे यांनी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे व शिक्षक सेनेचे संतोष आयरे यांना दिले . 


समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिलेल्या निवेदनांत म्हंटले आहे की ,मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री नाम . दादा भुसे यांची भेट घेऊन मुख्याध्यापकांचे अर्जित रजा रोखीकरण , वेतनेतर अनुदान ,मेडिकल बिलांची राज्यशासनांकडून शंभर टक्के प्रतिपूर्ती , टीईटी परीक्षा काठिण्य पातळीयांच्यासह अनेक विषयावर  निवेदन दिले . व अर्जित रजा रोखीकरणाचा प्रस्ताव  राज्याचे शिक्षण संचालक मा .शरद गोसावी  यांच्याकडून मंत्रालयात आलेला आहे . तो अवलोकनी घेऊन खाजगी प्राथ. शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ द्यावा , अशी विनंती केली .हे निवेदन स्वीकारून नाम .दादा भूसे यांनी तात्काळ संबंधित विभागाला हे निवेदन देण्याचे निर्देश दिले व याबाबत लवकरच मार्ग काढू असे आश्वासन त्यानी दिले .


यावेळी मंत्रालयामधील  उपसचिव आबासाहेब कवळे , अवर सचिव शरद माकणे , अवर सचिव विशाल लोहार , अवर सचिव संतोष परमार  विकास सावंत , संतोष नेर्लेकर सत्यजीत जाधव या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अर्जित रजा रोखीकरण , मेडिकल बिलांची प्रतिपूर्ती , शाळांचे वेतनेतर अनुदान , म भता लागू करणे , टीईटीच्या अटीच्या अधिन राहून पदोन्नती , डीसीपीएस / एनपीस खाती नसलेल्यांच्या फरकांच्या रक्कमा रोखीने अदा होणे व सेवानिवृतांना ग्रॅच्युईटी मिळणे , इ . चौथी व सातवी शिष्यवृती परीक्षेच्या इंग्रजी विभागामध्ये मराठीतून सूचना देणे इत्यांदी मागण्यांबाबत निवेदने देऊन चर्चा केली व या मागण्या पूर्णकरण्याची आवश्यकता का आहे याचे स्पष्टीकरण दिले . या अधिकाऱ्यांनी संबंधीत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन हे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले असल्याची माहिती राज्याध्यक्ष भरत रसाळे व सेनेचे समन्वयक संतोष आयरे यांनी दिली आहे .


     -----------------------------------


 लाभ मिळणे पर्यंत प्रयत्न करतच राहणार  


    राज्यातील हजारो शाळांच्या मुख्याध्यापकांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेने त्यांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मिळेपर्यंत स्वस्थ न बसता प्रयत्न करतच राहणार असा निर्धार आम्ही केला आहे . 


                        -  भरत रसाळे


                 ---------------------