वादळ वाऱ्यात सुद्धा गाभाऱ्यातील वात शांतपणे तेवत असते, समाजकारणात तूम्हीही असेच तेवत रहा : वीरेंद्र मंडलिक यांना पत्रकारांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Kolhapur news
By -

 

         

      
     
    


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


 वादळ वारे आणि विजा यांच्या तुफानात सुद्धा गाभाऱ्यातील वात शांतपणे तेवत असते तसेच तुम्ही ही समाजकारणात तेवत रहा अशा भावोत्कट शुभेच्छा कागल व कोल्हापूरच्या पत्रकारांनी युवानेते वीरेंद्र मंडलिक यांना त्यांच्या 31व्या वाढदिवसानिमित्त आज मुरगूड येथे दिल्या.


   लोकनेते स्वर्गीय सदाशिवराव जी मंडलिक आणि माजी खासदार संजय मंडलिक यांचा तेजस्वी वारसा आपल्याला लाभलेला आहे.यश अपयश येत जातात,वरदान आणि शाप सुद्धा भोगावे लागतात.जनसंपर्क आणि समाजसेवा यातून तुम्हांला ऊर्जा मिळत राहील. शक्तिशाली अणुबॉम्बचा शोध लावणाऱ्या आईन्स्टाईनला सुद्धा एका कवितेत कवीने सांगितले होते दोन युद्धाची वेडी वादळे आपटून गेली तुझ्या खिडकीवर नाही हलली तुझी ज्योत. तुम्हालाही आईन्स्टाईन व्हायचे आहे . सदाशिवराव मंडलिक व्हायचे आहे असे प्रेरणादायक संदेश कागल व कोल्हापूर येथील पत्रकारांनी त्यांना दिले. या वयात सामाजिक व राजकीय परिपक्वता आपण विकसित केली आहे ती कौतुकास्पद आहे.


   सत्काराला उत्तर देतांना वीरेंद्र मंडलिक म्हणाले , देवाधिकांच्या काळात नारद मुनी जसे  त्यांना दिशा दाखवायचे तसेच कार्य या युगात पत्रकार करत असतात. रोखठोक मार्गदर्शन फक्त त्यांच्या कडूनच मिळत असते. या सर्व पत्रकारांचा मी अत्यंत ऋणी आहे असे विनम्र उद्गार वीरेंद्र मंडलिक यांनी काढले.


    पत्रकारांच्या वतीने बी न्युज चे मोरे, सकाळचे वारके, पुढारीचे मधुकर भोसले, जेष्ठ पत्रकार व 'कोल्हापूर न्युज नेटवर्क' चे वि. रा भाेसले, ओंकार पोतदार, लोकमतचे अनिल पाटील,तरुण भारतचे रविंद्र शिंदे, इत्यादीनी काढले.


    दै. सकाळचे अविनाश चौगुले यांनी प्रास्ताविक केले. कोजीमाशी च्या चेअरमन पदी त्यांची निवड झाल्या ने त्यांचा ही सत्कार पत्रकारांच्या वतीने करण्यात आला.


   सत्कार प्रसंगी पत्रकारांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. सांकेतिक स्वरुपात त्यांना लेखणी ही (pen) प्रदान करण्यात आली.प्रिंट मीडिया सह डिजिटल मीडिया चे मिळून चाळीस पत्रकार यावेळी उपस्थित होते.


इतर उपस्थित पत्रकार याप्रमाणे  दैनिक पुढारी चे उपसंपादक राजन वर्धन, भैरवनाथ डवरी,प्राचार्य शाम पाटील, शशिकांत भोसले, प्रकाश कोकितकर, प्रा. तात्यासाहेब मोरे, टी एम सरदेसाई,राजू चव्हाण, प्रवीण सुर्यवंशी,दिलीप मगदूम, समिर कटके, विजय मोरबाळे,जे. के. कुंभार, सागर लोहार. सुधीर बंडगरे,प्रकाश कारंडे, प्रशांत साठे,सर्जेराव भाट,एकनाथ पाटील, प्रकाश तिराळे,बाबासो चिकोडे, कलंदर सनदी,संजय कांबळे, फारुख मुल्ला,मनोज हेगडे, लक्ष्मण चावरे,प्रा. लता पालकर,  जनगर्जना लाईव्हचे प्रणव चौगुले . 






   -----------------------------------------