कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची फरक बिले मंजूरीसाठी पाठवली - शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत

Kolhapur news
By -

          



           कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


   कोल्हापूर जिल्ह्यातील  ४ हजार १५५  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची  ३५ कोटी ४६ लाख ६५ हजार ९८० रूपये इतकी फरक बीलाची रक्कम मंजूरीसाठी २ फेब्रुवारी रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविली असून या कार्यालयाकडून ही बिले अंतरिम मंजूरीसाठी शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांच्याकडे  पाठविली जातात. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी प्रसिद्धीस दिली आहे.


   कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक ४१५५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ३५कोटी ४६ लाख ६५ हजार ९८० रूपये  बीलाची रक्कम पुढील प्रमाणे फरकाची आहे.वरिष्ठ वेतन श्रेणी फरक,  कोर्ट केसेस बील, महागाई भत्ता फरक, शिक्षण सेवक  टोटल  पगार फरक बील, सहावा व सातवा वेतन आयोग फरक, पदोन्नती फरक, वार्षिक वेतन वाढ फरक, निवड श्रेणी फरक, चालू आर्थिक वार्षिक फरक, निलंबित कालावधीतील फरक बीले आदी प्रकारची बील काढून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविले आहेत अशी माहिती वेतन पथकाचे अधिक्षक उदयसिंगराव सरनाईक यांनी दिली. ४१५५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची फरक बीले माध्यमिक शिक्षण विभागाकडून वेळेत पाठविली गेल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांचे अभिनंदन शिक्षण क्षेत्रातून होत आहे.


              --------------------------