कोल्हापूर न्यूज नेटवर्क
ज्या केंद्रावर सीसीटीव्ही नाहीत, त्या केंद्रावरचे संचालक व सर्व स्टाफ बदलण्यात आलेला आहे. परीक्षेसाठी सर्व केंद्रावर बैठे पथके व भरारी पथके उपस्थित ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी व विभागीय मंडळाकडून नियोजन करण्यात आलेले आहेत. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दिली.
बारावीचा पेपर सुरू होत आहे.७३ केंद्रापैकी पाच केंद्रावर पूर्ण वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही नाहीत. इतर ६८ केंद्रावर सर्व वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही आहेत. जिल्हाधिकारी हे दक्षता समितीचे प्रमुख आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संस्था चालकांची सभा घेऊन सीसीटीव्ही सर्व वर्गात बसवण्याच्या सूचना देण्यात आले आहे होत्या. त्यामुळे जिल्ह्यात बारावीच्या ७३ केंद्रातील ६८ केंद्र व दहावीच्या १४१ केंद्रापैकी १३१ केंद्रावर पूर्ण वर्ग खोलामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत.
तसेच उपद्रवी व सीसीटीव्ही नसणाऱ्या केंद्रावर ड्रोन शूटिंग व व्हिडिओ शूटिंग इ. ची व्यवस्था करण्यात आलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून बारावी साठी ५०४८७ व दहावी साठी ५५०८४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होणार आहेत. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा पत्र देण्यात आलेले आहेत. सर्व परिरक्षक केंद्राना पोलीस बंदोबस्त देणेत आला आहे.
----------------------------

