नानीबाई चिखलीच्या शिवानी विजयसिंह भोसले सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्या

Kolhapur news
By -

              
              


           


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


      नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार शिवानी विजयसिंह विजयसिंह भोसले विजयी झाल्या.चिखली मतदारसंघातून त्या सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत . तसेच कागल  तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहाही जागांवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. संजय मंडलिक गटाला केवळ पंचायत समितीच्या एका जागेवरच समाधान मानावे लागले. 


    नानीबाई चिखलीच्या शिवानी विजयसिंह भोसले या यापूर्वीच्या एक टर्म जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यांनी जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे सभापती पद ही भूषवले आहे. जिल्हा परिषदेच्या भावी अध्यक्षा म्हणून ही त्यांचे नाव चर्चेत आहे. 


चिखली पंचायत समिती  मतदार संघातून महायुतीच्या सुवर्णा जाधव तर हळदी पंचायत समिती मतदारसंघातून मनीषा पाटील निवडून आल्या. या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत विजयाचा आनंद  साजरा केला.  


 कागल तालुक्यातील सहा जिल्हा परिषद सदस्य महायुतीचेच

       


           चिखली पंचायत समिती सदस्या

             




             ----------------------------------------------