समाज सेवेला अध्यात्म शास्त्राची जोड द्या - नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील :ब्रह्माकुमारी : विश्वविद्यालयामार्फत नगरसेवकांचा सत्कार

Kolhapur news
By -

              



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


        नगरसेवक पद हे सेवेसाठी आहे. समाज सेवेला अध्यात्म शास्त्राची जोड द्या असे उद्गार मुरगूडच्या नूतन नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी पाटील यांनी काढले. येथील ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालया मार्फत केलेल्या सत्कारास उत्तर देतांना त्या बोलत होत्या.


  त्यांच्या  सह सर्वच नगरसेवकांचा सत्कार विद्यालयात आयोजित केला होता. तेवीस पैकी वीस नगरसेवक या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. सर्वाना केशरी फेटे बांधण्यात आले व शाल तसेंच संस्थेचे पवित्र सन्मान चिन्ह अर्पण करण्यात आले.सुमधुर मंगल संगीताची जोड असलेल्या या पवित्र सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक लक्ष्मी बहेनजी यांनी केले. अध्यक्षीय भाषणात लता बहेनजी म्हणाल्या की  समाजकार्यात  ईश्वरीय भाव ठेवल्यास त्यातील आत्मिक आनंद उच्चकोटीचा असतो. विश्वविद्यालय सर्व धर्म समभाव सांभाळत ईश सेवेचे उदात्त कार्य देश विदेशात करत आहे आणि शांतीचा संदेश देत आहे.


  सत्कार मूर्तिच्या वतीने जेष्ठ नगरसेवक सुनील रणवरे यांनी मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यास उपस्थित नगरसेवक याप्रमाणे....

      उपनगराध्यक्षा श्रीमती रेखाताई मांगले,शिवाजीराव  विठ्ठल चौगुले,, सुहास पांडुरंग खराडे, दत्तात्रय साताप्पा मंडलिक, रणजित विलास भारमाल, अनिल धोंडीराम राऊत, बजरंग ज्ञानू सोनुले, सत्यजित अजितसिंह पाटील, सौ. संध्या उद्धव पाटील, सौ. वैशाली विक्रम गोधडे, सौ. सुजाता जगन्नाथ पुजारी, सौ. सुरेखा कुंडलिक लोकरे, सौं. गीतांजली संभाजीराव आंगज, सौं. संजीवनी राजेंद्र कांबळे, सौं. विजयमाला दीपक शिंदे, श्रीमती निकोबीन बारदेसकर,स्वीकृत सदस्य सुनील मंडलिक, राहुल शामराव शिंदे.


या उदात्त सत्कार सोहळ्यास सुशोभीत करण्यासाठी योगदान देणाऱ्या स्वयंसेवक भाईंची नावे याप्रमाणे...संजय मगदूम, संभाजी पाटील, रामचंद्र पाटील, भांबरे भाई, इत्यादी.


   विद्यालयाचे शांतीवचन संबोधन व ध्यानधारणा ने सांगता झाली



             


               -----------------------