कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि इयत्ता बारावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला. मुख्याध्यापक एस. पी. पाटील यांच्या अध्यक्षते खाली समारंभ संपन्न झाला.
शालांतर्गत विविध स्पर्धामध्ये मिळवलेल्या यशा बद्धल विदयार्थ्यांचा सन्मान चिन्हे व प्रमाणपत्रे देऊन सत्कार करण्यात आला.सदर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. एस. एस. कोंडेकर यांनी केले, प्रा. पी. एस. पाटील शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक एस. पी. पाटील यांचे विदयार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण झाले व समारंभाची सांगता झाली. कार्यक्रमांचे नियोजन जिमखा प्रमुख प्रा.सौ. एस. एल. डेळेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. सौ.जे. टी. पवार यांनी केले. प्रा. ए. एस. मांगोरे यांनी आभार प्रदर्शन केले.
---------------------------



