कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शाळा वाचवा वाचवा शिक्षण वाचवा अभियानांतर्गत मेळावे, परिषदा, बैठका, सभा घेऊन जिल्ह्यात जनजागृती करण्याचा निर्धार कोल्हापुर येथे मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शाळा बचाव आंदोलनाचा आढावा व पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्षस्थानी कॉम्रेड उदय नारकर होते.
सुरुवातीला या आंदोलनाचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई यांनी शिक्षण हक्क यात्रेचा आणि शाहू समाधी स्थळी झालेल्या शिक्षण हक्क परिषदेचा आढावा घेतला. येणाऱ्या काळात ज्या बहुजन, कष्टकरी, दलित जातवर्गातील मुले सरकारी शाळेत शिकताहेत त्या जातवर्गाला हा धोका दाखवून देण्यासाठी जागृतीची मोहीम तातडीने येथे घेण्याची आवश्यकता असलेली त्यांनी सांगितले. त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कॉम्रेड उदयनारकर म्हणाले की आपण शिक्षण हक्क यात्रा काढून सुरुवात केली आहे. अजून आपल्याला भरपूर कष्ट घ्यावे लागणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात यासाठी प्रबोधनाची मोहीम आपण हाती घेऊ.
विजय देवणे म्हणाले आम्ही शिक्षण हक्क यात्रा काढून एक चेतना निर्माण केली आहे. आता ही पेटवलेली ठिणगी पुन्हा वनव्यात रूपांतरित करूया.
सम्राट मोरे म्हणाले भुदरगड राधानगरी या तालुक्यात सर्व शाळा आम्ही पिंजून काढू लोकांना शाळा बंद चे धोके दाखवून देऊ.
कृष्णा भारती म्हणाले हे आंदोलन राजकीय पक्षांच्या पुढाकारात न होता ते सामाजिक चळवळीच्या पुढाकार्याने करूया यावेळी शफिक देसाई, रवींद्र बंदसोडे यांनीही महत्त्वाच्या सूचना मांडल्या शरद पाडळकर यांनी आभार मानले
------------------------------
पालक व शिक्षक एकत्र येणार
यावेळी सुधाकर सावंत आणि उमेश देसाई यांनी गावोगावी बैठका सभा घेऊन विभागवार १५ एप्रिल पासून पालकांचे मेळावे घेण्याचा कालबद्ध कार्यक्रम मांडला. तर प्रसाद पाटील यांनी मार्च अखेर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना पालक व शिक्षक असे एकत्रित निवेदन देण्याचे नियोजन मांडले.
--------------------------------------

