कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र, कर्नाटक मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापुर ता. भुदरगड येथील सद्गुरु बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेस हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला.
सोमवार दिनांक 9 मार्च दिवशी समाधीपुजन, अभिषेक व विनापुजन देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशिलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.भंडारा यात्रेस प्रारंभ झाला.याप्रसंगी हरी भजन,धनगरी ढोल वादन असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.बाळुमामाची आरती झाली. फटाक्यांची आतषबाजी झाली . भंडारा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व कळसावर आणि भक्तनिवास येथे नेत्रदिपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.आज पहिल्या दिवसापासूनच नवरात्र उपवास करणारी भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी ,सचिव रावसाहेब कोणकेरी,संदीप मगदूम, दत्तात्रय पाटील दिनकरराव कांबळे ,संभाजी पाटील यशवंत पाटील, दिलीप पाटील,, इंद्रजीत खर्डेकर ,रामांना मरेगुदरी, करणसिंह भोसले, बसवराज देसाई, विनायक शिंदे तमाणा मासरेडी, ग्रामस्थ, भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होता.
-----------------------------------

