कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
"आई मला गर्भातच मारणार का गं? मी ही वंशाचा दिवा होणार नाहीं का गं? " हे प्रश्न आहेत एका गर्भातील स्त्री भ्रूण रुपी भावी मुलीचे.प्रत्येक विचारवंत आई आणि बाप यांच्या ह्रदयाला जाऊन भिडणारा हा प्रश्न उचलून धरला आहे मुरगूड येथील एक प्रज्ञावंत वकील ऍड.राणाप्रतापसिंह सासने यांनी.
बिद्री येथे श्रद्धा हॉस्पिटल मधील घृणास्पद स्त्री भ्रूण हत्याकांड पोलिसांनी उघडकीस आणले तेंव्हा सारे जिल्हा प्रशासन खाडकन जागे झाले.जिल्हा पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांचे तमाम माता भगिनींनी आभार मानायला पाहिजेत. त्यानी विना विलंब या क्रूर खेळावर कायद्याचे घाव घातले. पुरुषा पेक्षा काय कमी आहे स्त्री मध्ये? वंशाचा दिवा काय फक्त पुरुषच होऊ शकतो? अशी अनेक विचारवंत जोडपी आहेत की त्यांनी फक्त एक किंवा दोन मुलीवरच खुप खुप समाधान मानले आहे.त्यांचे संसार उत्तम चालले आहेत.
ऍड. राणाप्रतापसिंह सासने यांनी त्यांच्या नावाला शोभेल असाच आपला बाणा या सामाजिक प्रश्ना बद्दल दाखवला आहे. स्त्री ही वंशाचा दिवाच काय पण धगधगती मशाल सुद्धा होऊ शकते असे प्रतिपादन त्यांनी केंद्र शासनाच्या 'बेटी बचाव बेटी पढाव 'या मोहीमे तील व्याख्यानात सांगितले. जिल्हा महिला व बाल विकास विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा योजना, करवीर मार्फत कळंबा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे परखड विचार मांडले.
दीडशेहून अधिक संख्येने उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविकांना त्यांनी संबोधित केले. स्त्री भ्रूण हत्ये चा गुन्हा करणाऱ्या निर्दयी माता व संबंधित डॉक्टर यांना कायद्याने तीन ते पाच वर्षा पर्यंत सक्त मजुरीची शिक्षा व एक लाख पर्यंत दंड होऊ शकतो असे सांगत त्यांनी स्त्री सन्मान योजनेची माहिती सुद्धा दिली.अंध श्रद्धा, पारंपरिक वंश वादाची सडकी विचारसरणी यावर सुद्धा त्यांनी घणाघात केला.
वेळ पडल्यास बेटी बचावची ही मोहीम जिल्हाभर आणि राज्यभर सुद्धा विना मोबदला राबवण्याची तयारी त्यांनी दाखवली. प्रशासनाने तशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात कारण हा प्रश्न फक्त एका मातेचा किंवा एका बालिकेचा नाहीं साऱ्या देशाचा आहे.
केवळ पैशाच्या हव्यासापोटी एखादी स्त्रीच जर स्त्री भ्रूण हत्या करणारी कैदासीन बनत असेल तर ते एक भयाण दुर्दैव ठरेल.स्त्री ही केवळ भोग वस्तू नाहीं. ती माता आहे, बहीण आहे, सून आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारतीय संस्कृती मधील पूजनीय आदिशक्ती आहे. नवदुर्गेच्या रूपात आपण तिला पूजत असतो.कौमार्यात माहेरी असते तेंव्हा ती आई वडिलांची आणि जेष्ठतम आजी आजोबांची सेवा करत असते.लग्न होऊन सासरी गेली तरी सासर. माहेर अशी दुहेरी काळजी तीच वहाते.या उलट मदिरेच्या आहारी गेलेला पुत्र कुटुंबा साठी किती घातक ठरतो हे अनेक घटनातून दिसून आले आहे. आई वडिलांना तारांकित वृद्धाश्रमात धाडून परदेशीं संसार थाटणारे वंशाचे दिवे पण आज आपण पहातो.
बेटी बचाव मोहिमेतील आरोग्य सेविका सॊ. ज्योती कांबळे आणि सॊ. मुजावर यांनी या मोहिमेचे आयोजन केले होते.
सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, क्षेत्रातील अनेक विधायक उपक्रमात अग्रेसर असलेल्या मुरगूड शहराच्या कीर्तीत ऍड. सासने यांनी बेटी बचाव चे आणखी एक पीस रोवले आहे. कित्येक वर्षानी या शहराला सौ. सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील यांच्या रूपाने महिला नगराध्यक्षा लाभल्या आहेत. सॊ. शिल्पा ताई खोत या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून लाभल्या आहेत. पंचायत समितीची सभापती पदे,महापौर पदे एवढेच काय देशाचे राष्ट्रपती पद सुद्धा महिलांनी भूषविले आहे.
अशा या सामाजिक रचनेत स्त्री भ्रूण हत्या होणे जसे निंदनीय आहे तितकेच पोलीस प्रशासन आणि ऍड.सासने यांच्या सारख्या कायदे पंडितांनी हाती घेतलेले स्त्री भ्रूण रक्षणाचे कार्य वंदनीय आहे.
"मुलगी वाचवा, देश वाचवा"
"आई, मला जगू दे मीही तुझा अभिमान बनेन"
"स्त्रीभ्रूणहत्या थांबवा , हीच खरी मानवता"
"आई, मला जगू दे… मीही तुझा अभिमान बनेन."
"मुलगी वाचवा, देश वाचवा!"
"स्त्रीभ्रूणहत्या म्हणजे मानवतेचा खून."
"मुलगा-मुलगी समान — हाच खरा आधुनिक विचार."
"एक मुलगी वाचली तर एक पिढी वाचते."
"मुलगी आहे तरच भविष्य आहे."
"स्त्रीभ्रूणहत्या थांबवा, समाज वाचवा !"
"Let Her Live — Save The Girl Child"
"Don't Kill Me Before I See The World"
"Respect Girls, Protect Future"
--------------------------

