कागल पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या सुवर्णा पाटील,तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रजीत पाटील यांची बिनविरोध निवड

Kolhapur news
By -

             


          कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       कागल पंचायत समिती सभापतीपदी सुवर्णा पाटील,तर उपसभापतीपदी इंद्रजीत पाटील  यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीच्या अध्यक्षस्थानी कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे होते. यावेळी सर्व पंचायत समिती सदस्य , जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने , नगराध्यक्षा सविता माने , गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे, जिल्हा परिषद सदस्य सुयशा घाटगे, राजे बँकेचे संचालक एम पी पाटील , मनोज फराकटे, शशिकांत खोत आदी उपस्थित होते. 


      सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक एकच अर्ज झाल्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्या. या निवडी नंतर गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या हस्ते सभापती व उपसभापतींचा सत्कार करण्यात आला .यावेळी शेती अधिकारी आप्पासाहेब माळी ,कक्ष अधिकारी संगीता काळे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सारिका कासाेटे यांच्यासह इतर उपस्थित होते. 


          --------------------------