वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम

Kolhapur news
By -

 

              

  
      

    


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क

 

सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याची अनोखी परंपरा पुढे नेत नामदार हसनसो मुश्रीफ यांच्या वाढदिनी प्राथमिक आरोग्य केंद्र मधील पेशंट, चिखली इंग्लिश स्कूल , कन्या व कुमार विद्या मंदिर मराठी शाळा, सर्व बालवाडी ,यांना केळी,बिस्कट,पाणी फ़िल्टर जार,सॅनिटायझर इतर साहित्य वाटप केले. 


या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेली ही मदत कौतुकास्पद ठरली. “वाढदिवस म्हणजे केवळ औपचारिक साजरा न करता समाजोपयोगी कार्यातून तो अर्थपूर्ण बनवावा,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत सुरेश ढेकळे व बाबासाहेब कांबळे यांनी पुष्परोपे देऊन केले. पर्यावरणपूरक पद्धतीने केलेल्या या स्वागतामुळे कार्यक्रमाला वेगळीच छटा लाभली. यावेळी शाळेच्या वतीने मा. मुश्रीफ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


या प्रसंगी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सदाशिव तुकान, संतोष काटकर, प्रकाश वाडकर, किशोर नुल्ले, अशोक नांगणुरे, बाबुराव वाडकर, गोरख डवरी, अनिल परमणे, प्रमोद वाडकर, रहीम जमादार, अमोल चौगुले, गैबी नाईक यांच्यासह शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम नियमित राबविण्याची गरज व्यक्त केली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नामदेव चौगुले यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतातून समाजसेवेची जाणीव प्रत्येकाने ठेवावी आणि वाढदिवसासारख्या प्रसंगी गरजूंना मदत करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.एकूणच, समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस उपक्रम चिखली परिसरात चर्चेचा विषय ठरत असून इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


            ----------------------